सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

चांदण्यात भटकंती

कल्पतरू जागतिक साहित्य मंच

चांदण्या रात्रीत भटकंती

    अहाहा काय  सुंदर टिपूर चांदणे .  काळ्याभोर आकाशी अनेक  लुकलुकणा-या चांदण्या  थंड मंद शीतल वा-याची झुळूक. नभी शशी तारिकांचा विलोभनीय खेळ.
जोडीला साथीदाराची सोबत.  मग काय विचारता ? सोने पे सुहागा सारिखे .
   दोघे हातात हात घेउन मस्त चांदण्यात फिरताना आगळीच मजा अनुभवली.
एक एक करत चांदणी शशी भोवती फेर धरून नाचत ... जणू काही रास करत होत्या.
मधेच शशी ढगा आड जाऊन तारिकाशी जणू लपंडाव खेळत होता.
सहज ओळी ओठी आल्या.

एक आगळा आनंद
चालतांना चांदण्यात
चमकती अगणिक 
तारे नभीच्या अंगणात

चंद्र चांदण्यांचा चाले
खेळ नभी लोभनीय
रुप खुले चंद्रासवे
चांदणीचे रमणीय

   अशा वातावरणात मन प्रसन्न आनंदित होते. प्रेमी युगुल  त्यांच्यात   खूश  होते.
जलाशयात शशीचे प्रतिबिंब  फारच मोहक दिसत होते.
 काळ्या  नभांगणी लुकलुक करणा-या तारिका मोहक हसत मुरडत फिरत आहे असे
लोभनीय दृश्य वाटत होते.
    कोजागिरीची  रात्र तर फारच सुंदर असते अशा रात्री जलाशयात होडीत विहार करणे जनमनास भावते.चांदण्याच्या रात्रीत  नभाकडे पाहत बसण्यात किती वेळ गेला उमजत नाही.  अशा रम्य रात्री सहजच मनी   सुचले
       अशा रम्य चांदराती
       प्रेमी युगुल रमले
      भाव हळुच मनीचे
      मुग्धपणे उमजले

आणि या चांदण्यात विहरताना सहज जलाशयाकडे लक्ष जाता शनीचे रूप खुणावत होते. मनास लोभवित होते.व माझे मन त्या क्षणी मला काही सांगत होते. पटकन झरणी माझी झरु लागली.व ती वदली
        रूप मोहक चंद्राचे
        नभी दिसते सोनेरी
        प्रतिबिंब ते जाते
        भासे  हसरे चंदेरी
 अशा सुंदर. कल्पना हे सारख्या सामान्याच्या मनी आल्या तर महान सारस्वतांच्या
कल्पना काय सुंदर असणार . तर या विश्वेवराची काय किमया आहे.चंद्र. तारे तारिकांची  निर्मिती केल्याने हे विलोभनीय दृश्य आपल्याला दिसते.जितकी
दुपारच्यावेळी  ग्रीष्मात असह्य गर्मी   तितकीच शीतलता अनुभवयास मिळाली.
मन त्या चचांदण प्रकाशात न्हावू निघाले
कधी चांदरात संपत आली व अलवार चांदण्याचा पसारा आवरला गेला याचे भानच नाही राहिले. 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...