शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

तुळस. ...




भारतीय कोल्हापूर मंच
आयोजित
विषय तुळस माझ्या अंगणी
अष्टाक्षरी. प्रकार

      तुळस

शोभा वाढवी घराची
जेथे तुळस अंगणी
सदा राखते आरोग्य
जपा तिला मनोमनी

सांजवेळी लावताच
दिवा ज्योत वृंदावनी
घरातून प्रसन्नता
राहे सदा मनातूनी

नाव घेता प्रसादाचे
तुळशीचे हवे पान
होत नाही पूर्ण तोची
असा तिचा असे मान

जपताना पवित्रता
आरोग्यास गुणकारी
सर्दी खोकला पळवी
देई स्वास्थ्य घरी -दारी

विठ्ठलाच्या शोभे गळा
सदा तुळशीच्या माळा
आवडीने अर्पिलेल्या
दिसे सुंदर सावळा

अशी बहुगुणी वृंदा
हवी सदैव अंगणी
पवित्र्यात सदा उभी
मोद प्रसन्नता मनी


वैशाली वर्तक
अहमदाबाद








सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक 520
चित्र काव्य

     *संस्कृती जतन**

करी संस्कृती जतन
घेत मुलीला सोबत
घाली तुळशीला पाणी
हात जोडून हसत

देत माहिती रोपाची
आई देई शिकवण
किती वृंदा गुणकारी
होते जतन पर्यावरण

शोभा वाढवी घराची
जेथे तुळस अंगणी
सदा राखते आरोग्य
जपा तिला मनोमनी

आहे बहुगुणी वृंदा
हवी सदैव अंगणी
पवित्र्यात सदा उभी
मोद प्रसन्नता मनी


सांजवेळी लावताच
दीप ज्योत वृंदावनी
घरातून प्रसन्नता
राहे सदा मनातूनी.

वैशाली वर्तक
अहमदाबाद






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...