सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

सुखी समाधानी

 सिद्ध  साहित्यिक  समूह

विषय - चित्र काव्य

      

     सुखी समाधानी


बसली नटूनी थटूनी

प्रसन्न  भाव मुखावरी

डोळे मिटूनी  अनुभवी

सुखाचे क्षण क्षणभरी


दिसत आहेत दोघेही 

संसारी  सुखी समाधानी  

तडजोड राखली मनी

नांदती सौख्यात प्रेमानी


सखीचे पुरवितो लाड

साजण पण  कौतुकाने 

खुष होऊनी स्मित हास्ये

 लाली चढलीय सौख्याने


वारा तयात करी मस्ती

उडवी कुंतल अलवार

हसतमुखे नीट करी

धनी तयांना वारंवार


वैशाली वर्तक 

अहमदाबाद



गुरुवार, २८ जुलै, २०२२

मी लाट सागराची

 माझी  लेखणी

विषय -

*मी लाट सागराची*


   *लाट बोले*


लाट पहा सागराची

आली कशी उफाळून

आस मनी किना-याची

विरली मी किनारा पाहून


 *मी लाट सागराची*

 शंखमोती घेते सोबत 

देते पसरून तटाला

हेच काम चाले अविरत


किना-यास भेटण्यास 

मन माझे सदैव आतुर

पण भेटताचा किनारा

लाजून होते मी चूरचूर


लागतो जन मनास 

मला पाहण्याचा छंद

कितीदा पाहूनीही मज

पाहण्यात होती धुंद


जशी येते उफाळून मी

देते मनास उभारी

उठा झटकून मरगळ

घ्यावी जीवनी भरारी


मी  लाट सागराची

नित्य  चाले माझा खेळ

 किनारा सागरी आवडीचा

न उमजे किती गेला वेळ



वैशाली वर्तक

अहमदाबाद

गुरुवार, २१ जुलै, २०२२

मदतीचे बोट दशाक्षरी चित्र काव्य

स्वप्नगंध  साहित्य  समूह  आयोजित  दशाक्षरी काव्य स्पर्धा 
चित्राधारित दशाक्षरी काव्य

       मदतीचे बोट

धरुनिया मातेचेच बोट
टाकियले पहिले पाऊल
सुखमय जीवनाची सदा
लावण्यास जीवास चाहुल

करण्या जगी ज्ञान संपन्न
जगी  गुरुजींचे   बोट हवे
 शिल्पकार धडवितो शिल्प
तैसे  ज्ञान देण्या नव  नवे

बोट हवेच मायबापांचे
संसारात   ते मार्गदर्शक 
कसा हवा संसार नेटका
तेची असतात   प्रबोधक

जन्मतो वाढतो  समाजात
तयाचेही जाणावे महत्त्व 
लागतो देणे ऋण तयाचे
त्याचेही जीवनात श्रेष्ठत्व

कर्ता करविता असे तोची
जगाचा असे तोची पालक
विनवणी  ती बोट धरण्या
करीतात विश्वाची बालक

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १८ जुलै, २०२२

नियतीनशिबाचे बी// नियती


कल्पतरु जागतिक साहित्य मंच
आयोजित भव्य दिव्य राज्य स्तरिय 
उपक्रम कविता लेखन
विषय - नशीबाच बी

      
आयुष्याचे  शिवार फुलवू
नशीबाच बी आपुल्या हातात   
वेळ काम वेगची घालू सांगड
सुखी  आनंदी राहू जीवनात

झाड लावू नशीबाच
करीता प्रयत्न  हमखास 
उज्वल होईल भवितव्य 
प्रगतीची धरु कास

नशीबाच बी  असे यत्न 
करीता प्रयत्न  उचित
फोफावते शानदार
फळ देतेच खचित

बहरता नशीबाचे झाड
आयुष्य  होते समृद्ध 
सुख नांदे क्षणा क्षणा
होते नशीबाचे बी प्रसिद्ध 

भाव सकारात्मक मनी
तेच असती खत पाणी
झटकून मरगळ रहा तयार
सदा गावूया आनंदाची गाणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


अ भारतीय ठाणे जिल्हा समूह 1
आयोजित उपक्रम क्रमांक 497
16/3/23





भारतीय कोल्हापूर मंच 
आयोजित उपक्रम क्रमांक 295
28/8/24
विषय..नियती

खरं आहे  बाई जगी
तुझ्या पुढे न चाले मती
नियती च्या मनी येता
होते सर्वांची प्रगती

 होते कोणास ठावुक
 येणार अशी महामारी
 स्थगित होईल जग सारे
 नियतीने खेळ  दाविला भारी

 असूनी परिपूर्ण तयारी
 केली पराकाष्ठा तरी
  येतो ऐनवेळी प्रसंग बाका
 विरजण पडते यशावरी

 याला म्हणती खेळ नियतीचा
 करा मनसुबे मनातूनी बरे
साथ नसता नियतीची
 हार मानावी लागते हेच खरे. 


  प्रयत्न करणे आपले काम
असतो नियतीचा खेळ
  नशिबावर न विसंबिंता
जमावावा यशाचा मेळ

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
 









बुधवार, १३ जुलै, २०२२

गुरू विषयक...गुरू कल्पतरू/गुरूवर्य/गुरु महतीआठोळी अभंग गुरु कृपा योग

लालित्य नक्षत्र वेल
आयोजित  उपक्रम
काव्य लेखन 13/7/22
अष्टाक्षरी
विषय - गुरु कल्पतरू


गुरु शब्द उच्चारिता
  आई असे आद्य गुरू
   जिचे बोट धरुनिया
  शिक्षणाचे धडे सुरु

गुरू कल्पतरू बाप
आईसंगे शिकवण
दिले ज्ञान जगताचे
करु दोघांचे स्मरण

विद्या दिली शिक्षकांनी
केले तेजस्वी जीवन
गुरु कल्पतरु रुपे
स्मरू ऋण मनोमन

देतो रोज शिकवण
गुरु निसर्ग  महान
उपकार त्याचे फार
नकळत देई ज्ञान

साधा लहान किटक
देई चिकाटीचे ज्ञान
मोठा छोटा ज्ञानदानी
ह्याची हवी सदा जाण

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
भा सा व  सां मंच गडचिरोली
तथा फ्रिडम  स्टोरी
आयोजित  
काव्य लेखन स्पर्धा 
क्रमांक ८
विषय - गुरुवर्य
  शीर्षक  *गुरुमहिमा*

जीवनात गुरुवर्य हवाच
आई असेची प्रथम गुरु
बोट धरुनिया उभी करे
जीवनाचे शिक्षण सुरु

गुरु उपदेशा विणा
 ज्ञान मिळणे कठीण
तेची करीती मार्गदर्शन 
काम  न भासे नवीन

गुरु परंपरा ही रीत
जुनी  आलेली चालत
देती ज्ञान अनुभवाने   
 उठता बसता बोलत

गुरु महिमा अपरंपार
देती जीवनास आकार
गुरु कृपा योग जुळता
जीवनास भक्कम आधार

स्मरावे  ऋण जीवनी
गुरु कृपेचे महत्त्व  जीवनी
सदा वंदनीय गुरुवर्य 
जाणा उपकार मनोमनी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद13/7/22


शब्दसेतू साहित्य  मंच पुणे 
आयोजित  मासिक काव्य लेख स्पर्धा
स्पर्धेसाठी
विषय - गुरुकृपा योग

      *गुरू पाठीराखा*

येताची जुळूनी  । 
गुरू  कृपा योग ।। 
तो असे सुयोग
जीवनात ।।            १

गुरू कृपा योगे  । 
तरले तरले ।। 
आता  उध्दरले ।  
जीवनात  ।।            २

कृपेचा तो योग ।  
येताची जुळूनी  ।। 
कृपा ती पाहूनी  ।  
मोद वाटे          ।।     ३


लाभताची गुरू ।  
ज्ञान संपादन     ।।
दुःख  निवारण   । 
होत गेले         ।।        ४

गुरूच्या कृपेने   । 
मार्ग  तो सुलभ ।। 
शंकेचे  मळभ    । 
नसे मनी     ।।         ५


सद्गुरू विणा    । 
नसेची उध्दार  ।। 
ज्ञानाचा सागर   ।  
असे गुरू        ।।     ६

करा कृपा आता  ।  
आम्हांसी  रक्षावे।। 
दुःख  ते हरावे     !।  
दुरितांचे        ।।     ७

सद्गुरू कृपे । 
आनंदी जीवन ।।  
तृप्त  माझे मन । 
सांगे वैशू  ।।            ८

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

विषय - गुरु साक्षात परब्रम्ह

        गुरु जाणावा
 गुरू नसे केवळ व्यक्तीत
वसे तो  चराचरात
निसर्ग  असे गुरु महान
रोज देई ज्ञान अपार जगात

पशु पक्षी पण देती शिकवण
कळत नकळत मिळे ज्ञान
गुरु तर ज्ञानाचे सागर
नित्य  स्मरुनी मनी ठेवूया जाण

वैशाली वर्तक 
गुरू विण कोण दाखविल वाट

केले मार्गदर्शन  जगताला
व्यासांनी जीवन जगण्याचे
व्यास वा गुरुपौर्णिमेला महत्व
गुरु ना स्मरण वंदन करण्याचे

जीवनात   गुरु हवाच
आई असतेच आद्य गुरु
उभी करीते बोट धरुनी
शिक्षणाचे पाठ सुरू


गुरु उपदेशा विणा
 ज्ञान मिळवणे कठीण
तेची करीती मार्गदर्शन 
काम  न भासे नवीन

गुरु परंपरा  रीत जूनी
पूर्वकाळात आलेली चालत
गुरू असती ज्ञानाचा झरा
 मिळे ज्ञान उठत बोलत

जीवनी गुरू दाखवी वाट 
सांदिपनीं गुरू पदी कृष्णास
हिंदवी राज्य स्थापण्यास
रामदास गुरू लाभले शिवबास 



गुरु महिमा अपरंपार
देती जीवनास आकार
गुरु कृपा योग जुळता
जीवनास भक्कम आधार

स्मरावे  ऋण जीवनी
गुरु कृपेचे महत्त्व  जीवनी
  आज गुरुपौर्णिमा करु वंदन
मानू उपकार मनोमनी






आई 


आई (लिनाक्षरी)            
    
दोन्ही वर्णे आ व ई असती गुरू
प्रत्येकाची "आई" हीच आद्य गुरू.    १

धरूनीया बोट पहिले पाऊल
सुखी जीवनाची उमजे चाहूल.          २

 उठताच काय हवे नको पाही. 
 कुटुंब जनास मिळण्याची ग्वाही.        ३

मिळे स्वर्ग सुख तिच्याच कुशीत
बालपण जाई सर्वांचे खुशीत.              ४

येता घरी   तुला भेटण्याची घाई 
तव दर्शने  मन आनंदून जाई.               ५

जरी असता स्वामी , तिन्ही जगाचा
आई विना असे, तो कष्टी मनाचा.           ६


घटाकार देई , घटांना आकार
देई संस्कार बाळांना , ती अपार.              ७

होता जीवा कधी दुखापत कदा
येतो शब्द "आई " ओठावरी सदा.            ८


आई किती वर्णू , तव गुण गाथा
नमविते तुझ्या , थोरवीला माथा.               ९

शब्द पडती तोकडे गुण गाता
शब्द सुमने माझी अर्पिते आता.               १०


वैशाली वर्तक 
 अहमदाबाद











मंगळवार, १२ जुलै, २०२२

वृक्ष आणि पाऊस संवाद

वृक्ष व पाऊस

वृक्ष   --
 कधी रे बरसणार
 का बघशी रे अंत 
 त्राण नाही उरला
करीतोय मी खंत
पाऊस -
का  नाही वदला
जेव्हा घातलेत  घाव
 मानवाने  तुजवरी
नव्हते  का पुढचे ठाव

वृक्ष 
खर आहे रे तुझे
मानवाची कुंठलीय  मती
प्रगतीच्या नावे सारी
उध्वस्त  केली वनस्पती 

पावसा
 कसे करणार शोषण 
मुळांनाच नाहीपाणी  मातीत
कुठून बाप्ष सोडणार
पर्णच नाहीत फांदीत

वृक्ष 
 आ

  

रविवार, १० जुलै, २०२२

अभंग ..देवा पांडुरंगा/ देवा तुझी साथ

सावली प्रकाशन समूह
आयोजित 
राज्यस्तरिय अभंग लेखन स्पर्धा
*स्पर्धेसाठी*
10 /7 22
विषय - देवा पांडुरंगा


*देवा पांडुरंगा* ।  तुझ्या  चरणाची । 
आस अंतरीची ।  माझ्या मनी      ।।  १

पूजूया मनात  । स्मरु  चिंतनात   । 
गाऊ भजनात   । पांडुरंग             ।।  २

ध्यानी मनी स्वप्नी ।   दिसे तव मूर्ती । 
देते सदा स्फूर्ती     । जीवनात         ।।    ३

*देवा पांडुरंगा*  । भक्तांचा तू श्वास  । 
 मनी एक आस    । दर्शनाची           ।।   ४

  तुझी कृपा होता  ।  मन आनंदेल  । 
  भरून पावेल       । सदासाठी        ।।   ५

  तूच मायबाप     । तूच पांडुरंग      । 
  गाते मी अभंग    ।   विठ्ठलाचे      ।।       ६

  तूझी  कृपा दृष्टी   । सा-या जगावरी । 
 उभा विटेवरी        । पांडुरंग           ।।      ७

वैशाली वर्तक 
अहमदाबादस्वराज्य लेखणी मंच आयोजित उपक्रम
29/12/22
विषय..*देवा  तुझी साथ 

देवा तुझी साथ ! लाभो सदा काळ!
आनंदी सकाळ ! होत असे!!

करीते मी भक्ती! तुजला  स्मरते!
वंदन करिते ! नित्य नेमे!

राहो देवा कृपा ।  तुझ्या  चरणाची । 
आस अंतरीची ।  माझ्या मनी      ।।  

पूजूया मनात  । स्मरु  चिंतनात   । 
गाऊ भजनात   । तुझेगान            ।।  

ध्यानी मनी स्वप्नी ।   दिसे तव मूर्ती । 
देते सदा स्फूर्ती     । जीवनात         ।।    

देवा विश्वंभरा । भक्तांचा तू श्वास  । 
 मनी एक आस    । दर्शनाची           ।।  

  तुझी कृपा होता  ।  मन आनंदेल  । 
  भरून पावेल       । सदासाठी        ।।   


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...