माझी लेखणी
विषय -
*मी लाट सागराची*
*लाट बोले*
लाट पहा सागराची
आली कशी उफाळून
आस मनी किना-याची
विरली मी किनारा पाहून
*मी लाट सागराची*
शंखमोती घेते सोबत
देते पसरून तटाला
हेच काम चाले अविरत
किना-यास भेटण्यास
मन माझे सदैव आतुर
पण भेटताचा किनारा
लाजून होते मी चूरचूर
लागतो जन मनास
मला पाहण्याचा छंद
कितीदा पाहूनीही मज
पाहण्यात होती धुंद
जशी येते उफाळून मी
देते मनास उभारी
उठा झटकून मरगळ
घ्यावी जीवनी भरारी
मी लाट सागराची
नित्य चाले माझा खेळ
किनारा सागरी आवडीचा
न उमजे किती गेला वेळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा