सावली प्रकाशन समूह
आयोजित
राज्यस्तरिय अभंग लेखन स्पर्धा
*स्पर्धेसाठी*
10 /7 22
विषय - देवा पांडुरंगा
*देवा पांडुरंगा* । तुझ्या चरणाची ।
आस अंतरीची । माझ्या मनी ।। १
पूजूया मनात । स्मरु चिंतनात ।
गाऊ भजनात । पांडुरंग ।। २
ध्यानी मनी स्वप्नी । दिसे तव मूर्ती ।
देते सदा स्फूर्ती । जीवनात ।। ३
*देवा पांडुरंगा* । भक्तांचा तू श्वास ।
मनी एक आस । दर्शनाची ।। ४
तुझी कृपा होता । मन आनंदेल ।
भरून पावेल । सदासाठी ।। ५
तूच मायबाप । तूच पांडुरंग ।
गाते मी अभंग । विठ्ठलाचे ।। ६
तूझी कृपा दृष्टी । सा-या जगावरी ।
उभा विटेवरी । पांडुरंग ।। ७
वैशाली वर्तक
अहमदाबादस्वराज्य लेखणी मंच आयोजित उपक्रम
29/12/22
विषय..*देवा तुझी साथ
देवा तुझी साथ ! लाभो सदा काळ!
आनंदी सकाळ ! होत असे!!
करीते मी भक्ती! तुजला स्मरते!
वंदन करिते ! नित्य नेमे!
राहो देवा कृपा । तुझ्या चरणाची ।
आस अंतरीची । माझ्या मनी ।।
पूजूया मनात । स्मरु चिंतनात ।
गाऊ भजनात । तुझेगान ।।
ध्यानी मनी स्वप्नी । दिसे तव मूर्ती ।
देते सदा स्फूर्ती । जीवनात ।।
देवा विश्वंभरा । भक्तांचा तू श्वास ।
मनी एक आस । दर्शनाची ।।
तुझी कृपा होता । मन आनंदेल ।
भरून पावेल । सदासाठी ।।
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा