सिद्ध साहित्यिक समूह
विषय - चित्र काव्य
सुखी समाधानी
बसली नटूनी थटूनी
प्रसन्न भाव मुखावरी
डोळे मिटूनी अनुभवी
सुखाचे क्षण क्षणभरी
दिसत आहेत दोघेही
संसारी सुखी समाधानी
तडजोड राखली मनी
नांदती सौख्यात प्रेमानी
सखीचे पुरवितो लाड
साजण पण कौतुकाने
खुष होऊनी स्मित हास्ये
लाली चढलीय सौख्याने
वारा तयात करी मस्ती
उडवी कुंतल अलवार
हसतमुखे नीट करी
धनी तयांना वारंवार
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा