आयोजित भव्य दिव्य राज्य स्तरिय
उपक्रम कविता लेखन
विषय - नशीबाच बी
आयुष्याचे शिवार फुलवू
नशीबाच बी आपुल्या हातात
वेळ काम वेगची घालू सांगड
सुखी आनंदी राहू जीवनात
झाड लावू नशीबाच
करीता प्रयत्न हमखास
उज्वल होईल भवितव्य
प्रगतीची धरु कास
नशीबाच बी असे यत्न
करीता प्रयत्न उचित
फोफावते शानदार
फळ देतेच खचित
बहरता नशीबाचे झाड
आयुष्य होते समृद्ध
सुख नांदे क्षणा क्षणा
होते नशीबाचे बी प्रसिद्ध
भाव सकारात्मक मनी
तेच असती खत पाणी
झटकून मरगळ रहा तयार
सदा गावूया आनंदाची गाणी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अ भारतीय ठाणे जिल्हा समूह 1
आयोजित उपक्रम क्रमांक 497
16/3/23
भारतीय कोल्हापूर मंच
आयोजित उपक्रम क्रमांक 295
28/8/24
विषय..नियती
खरं आहे बाई जगी
तुझ्या पुढे न चाले मती
नियती च्या मनी येता
होते सर्वांची प्रगती
होते कोणास ठावुक
येणार अशी महामारी
स्थगित होईल जग सारे
नियतीने खेळ दाविला भारी
असूनी परिपूर्ण तयारी
केली पराकाष्ठा तरी
येतो ऐनवेळी प्रसंग बाका
विरजण पडते यशावरी
याला म्हणती खेळ नियतीचा
करा मनसुबे मनातूनी बरे
साथ नसता नियतीची
हार मानावी लागते हेच खरे.
प्रयत्न करणे आपले काम
असतो नियतीचा खेळ
नशिबावर न विसंबिंता
जमावावा यशाचा मेळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा