बुधवार, २३ मार्च, २०२२

कथा जिद्द

शब्दसेतू साहित्य  मंच  
कथा
जिद्द 
 "मला इतक्यात लग्न नाही करायच .मला पण ssc व्हायचय." पण कोण ऐकणार. ? आई  व तिच्या दोन बहिणी  मामांकडे 
रहात होत्या. व स्वतःच्या  गावात शिक्षिणाची सोय नव्हती. 
मामाकडे रहाणे गरजे होते. 
    कधी या मामा कडे तर कधी दुस- या मामाकडे. 
एक मामा त्याकाळी जमखींडी संस्थानात  नोकरीस होता. त्यामुळे आर्थिक  परिस्थिती  छान होती. दुसरे मामा ..पेशाने शिक्षक .. त्यांची मुले शिकत होती. त्यांच्या बरोबर रहात असल्याने आईला शिकण्यात गोडी झाली होती. 
    दुस-या दोन बहिणींना तेवढी शिक्षणाची आवड नव्हती.. कल पण नव्हता. पण तसे हिचे नव्हते. पण मामी मंडळींना पण 3/3 भाच्या घरात तसेच स्वतःची पण 3/4 मुले त्या मुळे जशी स्थळे येता बहिणींची लग्ने उरकलीत. आणि स्वातंत्र्या पूर्वी चा काळ 
तेव्हा मुलींचे शिक्षण गौण मानले जायचे. वयाच्या 17/18 व्या वर्षी  लग्न होत. 
तसेच आई चे झाले .लग्न झाले ..सासरी आली. सासरी पण आर्थिक  परिस्थिती  बेताची ..मील गिरणीत वडिलांची नोकरी.
घरात आई बायको बहिण   व एकच कमविणारे. 
     पण काळाची गरज  तसेच आईची शिक्षण आवड जिद्द  बाबांना समजली .त्यांनी तिला शिक्षणाची सुरूवात  करण्यास त्यावेळी  व फा. म्हणजे व्हर्नीक्युलरा फायनल  परीक्षा  असे .तिला बसविले. आणि ती परीक्षा  देता शाळेतून त्या वेळी नोकरी  मिळत असे. ती परीक्षा  तिने यशस्वीपणे  पार केली. नुसती तिनेच नाही तर नणंदेस पण द्यायला लावली. ती म्हणायची", तू शीक बाई .माझे नाही झाले पण तू शीक .शिक्षण संसारात कामास येईल. स्वतःच्या  पायावर आपणास उभे रहाता आले पाहिजे. "
   एवढेच नव्हे आजु बाजुच्या समवयस्क  बायकांना पण ती सांगायची. शिक्षण  महत्त्व समजवायची. 
    तिने कुटुंबास हातभार लावण्यासाठी शिवण पण शिकली जेणे करुन चार पैसे कमवता येतील . व शिवण शिक्षका म्हणून पण शाळेत  नोकरी मिळेल .आणि तेच झाले. शिवण शिक्षिका म्हणून प्रायव्हेट शाळेत लागली. एकि बाजूस म्युनिसीपालटी शाळेत अर्ज करत होतीच. व तिच्या जिद्यीस यश आले. शाळेत  नोकरीस लागली. पण शिकवत असता  शालेय शिक्षणासाठी
पुण्यास दोन वर्षाचा कोर्स चालायचा. जेथे रहात होती ...त्या संसारच्या शहरात मराठी  माध्यम नसल्याने तिला पुण्यास जाणे भाग होते. व त्या कोर्सने नोकरीत पुढेप्रगतीची संधी मिळवण्याच्या कामाची होती. 
    शेवटी आई बाबांनी एकमते आईला पाठविण्याचे ठरविले. 
अर्थात आजुबाजुचे लोक म्हणत काय बाई आहे मुलांना सोडून शिकायला जात आहे. अहो बाहेरचे काय नातलग पण बाबांना म्हणाले की कशाला  पाठवतोय.पुढे  डोक्यावर चढेल. हो लोक
तर बोलणार च पण ते दोघे  विचाराने  खंबीर होते. ती पूण्यास जाऊन कोर्स पूर्ण  करुन आली.  
  पुढे मुले मोठी झाली.   मुलगा ssc झाला . तिची मनातील इच्छा  आजून बळकावली . तिने बाहेरून s s c चा फाॕर्म भरुन 
मुलाच्या सिलेबलचा वापर करुन ती s s c झाली. जिद्द  काय ती तिने दाखविली. पुढे  सिनियर पि टी सी होऊन म्युनिसीपालटी तील शाळेत प्रिन्सीपल  म्हणून नोकरी करत 
निवृत्त  झाली.  मी शिकणार ही मनीची जिद्द .
     तिने गरीब विद्यार्थ्यांना  शिकवून  विद्या  दान केले .जणु
शिक्षणाचा  वसाच घेतला होता.  
  आयुष्याच्या शेवटा पर्यंत  तीचे व पुस्तकाचे नाते अतुट 
होते.  जिद्द  म्हणजे काय आम्ही  तिच्यात पाहिली व तिच्या  कडून शिकलो. 
आज माझी जी लेखणी आहे ती ..तिचेच वरदान आहे. 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, २२ मार्च, २०२२

अष्टाक्षरी...झाडे शोधी सावलीला\ निसर्गाची साद



साहित्य सेवा प्रज्ञा मंच साहित्य  आयोजित 
22/3/22
अष्टाक्षरी काव्यलेखन  
*स्पर्धेसाठी*
विषय -   झाड शोधे सावलीला
    
     झाडे लावा

आली आता तीच स्थिती
नका तोडू वनश्रीला     
 दिसेनाशी झाली छाया
*झाडे शोधे सावलीला*       

प्रगतीच्या नावाखाली
नको करु वृक्षतोड
मानवाचा वाढे लोभ
वृक्षासवे नाते जोड

मुळे शोषती  जलाला  
 देती मेघ  नभाकडे
 बरसता जलधारा
  वृक्ष दिसे चोहीकडे

    
   वृक्ष  वल्लरी  हवीच
  पथिकाला देण्या छाया
   थकलेल्या जना  हवी
थंड सावलीची  माया
   
  होता नाशची वृक्षाचा
  कोण कोणा देई छाया
  *झाडे शोधी सावलीला*
    दिसे न प्रेमळ माया

वैशाली वर्तक 
अहमदाबाद








*स्पर्धेसाठी*
साकव्य स्पर्धा क्रमांक ४४
सौ प्रज्ञा मिरासदार यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा 
वाढदिवसाच्या शुभेच्छा 
विषय.  ... निसर्गाची साद
काव्य प्रकार 
शीर्षक...झाड शोधे सावलीला


आली आता तीच स्थिती
नका तोडू वनश्रीला     
 दिसेनाशी झाली छाया
*झाडे शोधे सावलीला*       

फार प्रगत होताना
नको करु वृक्षतोड
ध्यानी घे पर्यावरण 
वृक्षासवे नाते जोड


मुळे शोषती  जलाला  
देती मेघ  नभाकडे
बरसता जलधारा
 वृक्ष दिसे चोहीकडे

  वृक्ष  वल्लरी  हवीच
  पथिकाला देण्या छाया
  थकलेल्या जना  हवी
  थंड सावलीची  माया

  नसे कोप हा सृष्टीचा 
मानवाचा अती लोभ
प्रगतीच्या नावाखाली
थांबवूया आता क्षोभ  .

  होता नाशची वृक्षाचा
  कोण? कोणा? देई छाया
  *झाडे शोधी सावलीला*
    दिसे न प्रेमळ माया
   
  
   वैशाली वर्तक 
   अहमदाबाद





दडपण

शब्दांकुर  साहित्य  मंच
आयोजित 
उपक्रम 
विषय -दडपण

     जीवनभराचे
जीवन भराचे रहाते  
होता सुरुवात बालपण
कधीच नाही संपत
असते सदैव दडपण

 बालपणी अभ्यासाचे
मोठे होता नोकरीचे
असे नित्य चालतसे
पुढे वाढते कुटुंबाचे

होतात कामे दडपणाने
काम नियमित करण्याची
शिकतो न घेण्या दडपण
सवयच लागते दडपणाची

भाव मनी असावे सकारात्मक
बाळगावा दृढ आत्मविश्वास
जाते दूर पळूनी दडपण
मग निवांतात घ्यावा श्वास

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २१ मार्च, २०२२

स्वतःच्या फोटोवर काव्य

सावली प्रकाशन समूह  आयोजित 
उपक्रमासाठी
विषय - स्वतःच्या  फोटोवर काव्य
    प्रसन्न व्यक्तीमत्व

आहे माझी साधी रहाणी
  पण व्यक्तीमत्व आकर्षक 
   रंग संगतीची आवड
रूप दिसते चित्त वेधक

रंग साडीचा केशरी
सोनेरी काठ  पदर
चेहरा असे सदा हसरा
हास्य  दावीती ते अधर

गळा शोभतो हार
उजळलेले दिसे रूप
कानी चमकी कर्ण फूले
मोहक भासे सौंदर्य  खूप 


मुखावर भाव हसरे
शांत निर्मळ व्यक्तीमत्व
   भासे  सोज्वळ सौंदर्य
 चार लोकात दावी प्रभुत्व 

 बांधेसुद  असे शरीर 
 सौंदर्यात करी भर
आनंदी समाधानी वृत्ती 
दिसुन येते खरोखर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद









सावली प्रकाशन समूह  आयोजित 
उपक्रमासाठी
विषय - स्वतःच्या  फोटोवर काव्य रचना
           माझे व्यक्तीमत्व


उठूनी सकाळी लवकर 
उभारण्या मांगल्याची गुढी
घडवितेय दर्शन संस्कृती चे
चालविण्या  परंपरेची रुढी
 
नथ  नाकी, गळा तन्मणी
शोभे साधे रुप मनोहर
व्यक्तिमत्व खुलते मराठी
शोभून दिसतेय खरोखर 

 महाराष्ट्रा बाहेर  राहूनी
केलय संस्कृती चे जतन
मराठ मोळी नारी मी
भाषेसह वाचवितेय , मराठीपण

घेऊनी संगत नातवाला
देते सहज ज्ञान सणवाराचे
पहा कशी रुबाबात ऊभी
दर्शन घडते गुढी पाडव्याचे

वृषभ रास असता माझी 
सदा  आनंद मुखावरी
साधे पण टापटीप रहाणे
आहे भाग्यवान मी खरी



सावली प्रकाशन समूह आयोजित उपक्रमासाठी विषय - स्वतःच्या फोटोवर काव्य रचना माझे व्यक्तीमत्व 
 उठूनी सकाळी लवकर
 उभारण्या मांगल्याची गुढी 
घडवितेय दर्शन संस्कृती
 चालविण्या परंपरेची रुढी
नथ नाकी, गळा तन्मणी
 शोभे साधे रुप मनोहर 
व्यक्तिमत्व खुलते मराठी 
शोभून दिसतेय खरोखर 

 महाराष्ट्रा बाहेर राहूनी
 केलय संस्कृती चे जतन 
मराठ मोळी नारी मी
 भाषेसह वाचवितेय , मराठीपण

 घेऊनी संगत नातवाला
 देते सहज ज्ञान सणवाराचे
 पहा कशी रुबाबात 
ऊभी दर्शन घडते गुढी पाडव्याचे 

 वृषभ रास असता माझी 
 सदा आनंद मुखावरी 
साधे पण टापटीप रहाणे आहे 
भाग्यवान मी खरी 
 वैशाली वर्तक

रविवार, २० मार्च, २०२२

सण रंगाचा होळीचा/ सहाक्षरी होळी/आला सण शिमग्याचा / पंचाक्षरी

अभामसाप कोप्र महाड समूह
उपक्रम १५८
विषय - *रंगून जाऊ रंगात*

आला   हो सण रंगाचा
*रंगून जाऊ रंगात*
फुलली विविध फुले
आनंद  होतो मनात

 सण हा येता रंगाचा
  रंगोत्सव   खेळे सृष्टी 
 विसरून सारे जाती भेद
समतेची ठेवुया दृष्टी 

करुया संवर्धन  वनश्रीचे
लोभ मत्सराचे करु दहन
नको तोडणे जाळणे वृक्षाचे
करु पर्यावरण जतन

येता  ऋतुंचा राजा
 वसंत फुलला मनोमनी
ऐका कोकीळ कुजन
मोहर दिसे वनोवनी

पळस बहावांचे सुंदर
  रंग आकर्षती मनाला
रंगून जाऊ रंगात
नको  निराशा  जीवाला

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



सावली प्रकाशन समूह
स्पर्धेसाठी
विषय - होळी
   
*पर्यावरण जागृती*


फाल्गुन मासात
येतो सण होळी
चला खाउ सारे
पुरणाची पोळी

पहा बहरला
गंधित  मोगरा
 बहावा  पळस
 शोभतो  हासरा


करु संवर्धन 
नकोची दहन
वृक्षाचे रोपण
वनश्री जतन

जाळून टाकूया
मत्सर द्वेषाला
विलसे आनंद
सदैव  मनाला

 सण तो रंगाचा
  रंग उधळण
 सारू भेदभाव 
स्मरु आठवण

सप्तरंगी फुले 
 निसर्ग तो सारा
 पळस बहवा 
उधळीत  न्यारा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद











अ भा म सा पण समूह २
आयोजित उपक्रम६३६
विषय.. आला शिमग्याचा सण


आला सण शिमग्याचा
करू आनंदात साजरा
रंगून जाऊ या रंगात
निसर्ग पहा किती हासरा

 झाली वृक्षांची पानगळ
 पसरला पाला पाचोळा 
 फांद्या सा-या सुकलेल्या
 पसारा तयाचा करा गोळा.

स्वच्छ होईल परिसर
सुंदर राखण्या पर्यावरण
दहन करा पसारा होळीत
करू  नवे वृक्षारोपण

वाईट विचारांचे दहन
समतेची ठेवू दृष्टी
नाना रंगात फुलूनी
पहा रंगोत्सव खेळे सृष्टी

 जाऊ होलिका दर्शना
 अर्पूया  गोड पुरणपोळी
दुष्ट प्रवृत्तींना जाळूया
मी तू पणाची करू होळी

वैशाली वर्तक
 अहमदाबाद
                                              


काव्य निनाद साहित्य मंच
आयोजित उपक्रम क्रमांक २६४
विषय.. होळी पौर्णिमा
शीर्षक. ..सण रंगाचा
पंचाक्षरी 


फाल्गुन मासी
सण तो होळी
चला खाऊया
पुरण पोळी

 बहरलेला
 पहा  मोगरा
 अन  पळस
 शोभे हासरा

वृक्ष वर्धन
नको दहन
वृक्षारोपण 
वन जतन

जाळून टाकू
हेवे दाव्याला
 मिळे आनंद
सदा मनाला

 आज रंगाचा. 
आला तो सण
 मनेआनंदी
 झालेत जन
  

 फुले फुलली 
 निसर्ग  सारा
 पीत बहवा
फुलला  न्यारा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

साहित्यातून समाजसेवा


*स्पर्धेसाठी*
उनाड वारा साहित्य  परिवार आयोजित
राज्यस्तरिय काव्य स्पर्धा
(विशेष कारण - उनाड वारा साहित्य  परिवाराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त)
विषय - साहित्यातून समाजसेवा.

      समाजिक परिवर्तन 

साहित्य पण  असे माध्यम
करण्या समाजाची सेवा
लेखणी ने तर आजवर
दाविलाय तिचा अमुल्य ठेवा

करण्या जन जागृती वा  संघटना 
लेखणीच  दावी नामी युक्ती
गद्य  पद्य  व्यंग-चित्रातून 
लेखणी दावीते तिची शक्ती


होते  सहज साहित्य  प्रकाशन  
आहे साहित्याच्या  दोन धारा 
करण्या ज्ञान ,भक्ती ,आरोग्याचे प्रबोधन 
 गद्य - पद्य  चा अमाप पसारा     
 
 प्राकृत भाषेतील मायबोली
 सुधा-रसापरि अभंग वाणी  
 ओतप्रत भक्ति -रसांची
 विराजली  ओठावरची गाणी

विविध वाङमय येते  सामोरे
योजित करिता साहित्य संमेलने 
मासिक , पाक्षिक , दैनंदिने
करिती   सर्वची  ज्ञाना-र्जने.

साहित्यातूनी   अंधश्रध्दा निर्मुलन
घडविण्या सामाजिक परिवर्तन 
देऊन समाजास ज्ञानाचा मेवा
शिकवणीतूनी  होई अमुल्य दर्शन 


नवरसांचे  संपन्न  साहित्य
भाषेला तर करतेच, सदा समृध्द
दुहेरी काम  घडते साहित्यातून
सहज राही समाज सेवेला सिद्ध 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, १७ मार्च, २०२२

सांगू कसे तुला { कोरोनात केलेली विनवणी}

अभा म सा प ठाणे जिल्हा  2
काव्य लेखन उपक्रम
विषय - सांगू कसे तुला


देवा दयाधना रे
तू  तर अंतर्यामी 
जाणून घे ना व्यथा
सांगू कसे तुला मी

मी काय  सांगणार
तुला असतेच जाण
तूची कर्ता करविता
तव मर्जीनेच हले पान 


घडू दे भेटी आप्त जनांची
कर सारे जग पूर्ववत
दूर कर आता  महामारी
काम करण्या अविरत 

सांगू कसे तुला
करिते आता विनवणी
शरण आले तुजला
समजून घे मनोमनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...