अभामसाप कोप्र महाड समूह
उपक्रम १५८
विषय - *रंगून जाऊ रंगात*
आला हो सण रंगाचा
*रंगून जाऊ रंगात*
फुलली विविध फुले
आनंद होतो मनात
सण हा येता रंगाचा
रंगोत्सव खेळे सृष्टी
विसरून सारे जाती भेद
समतेची ठेवुया दृष्टी
करुया संवर्धन वनश्रीचे
लोभ मत्सराचे करु दहन
नको तोडणे जाळणे वृक्षाचे
करु पर्यावरण जतन
येता ऋतुंचा राजा
वसंत फुलला मनोमनी
ऐका कोकीळ कुजन
मोहर दिसे वनोवनी
पळस बहावांचे सुंदर
रंग आकर्षती मनाला
रंगून जाऊ रंगात
नको निराशा जीवाला
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सावली प्रकाशन समूह
स्पर्धेसाठी
विषय - होळी
*पर्यावरण जागृती*
फाल्गुन मासात
येतो सण होळी
चला खाउ सारे
पुरणाची पोळी
पहा बहरला
गंधित मोगरा
बहावा पळस
शोभतो हासरा
करु संवर्धन
नकोची दहन
वृक्षाचे रोपण
वनश्री जतन
जाळून टाकूया
मत्सर द्वेषाला
विलसे आनंद
सदैव मनाला
सण तो रंगाचा
रंग उधळण
सारू भेदभाव
स्मरु आठवण
सप्तरंगी फुले
निसर्ग तो सारा
पळस बहवा
उधळीत न्यारा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अ भा म सा पण समूह २
आयोजित उपक्रम६३६
विषय.. आला शिमग्याचा सण
आला सण शिमग्याचा
करू आनंदात साजरा
रंगून जाऊ या रंगात
निसर्ग पहा किती हासरा
झाली वृक्षांची पानगळ
पसरला पाला पाचोळा
फांद्या सा-या सुकलेल्या
पसारा तयाचा करा गोळा.
स्वच्छ होईल परिसर
सुंदर राखण्या पर्यावरण
दहन करा पसारा होळीत
करू नवे वृक्षारोपण
वाईट विचारांचे दहन
समतेची ठेवू दृष्टी
नाना रंगात फुलूनी
पहा रंगोत्सव खेळे सृष्टी
जाऊ होलिका दर्शना
अर्पूया गोड पुरणपोळी
दुष्ट प्रवृत्तींना जाळूया
मी तू पणाची करू होळी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
काव्य निनाद साहित्य मंच
आयोजित उपक्रम क्रमांक २६४
विषय.. होळी पौर्णिमा
शीर्षक. ..सण रंगाचा
पंचाक्षरी
फाल्गुन मासी
सण तो होळी
चला खाऊया
पुरण पोळी
बहरलेला
पहा मोगरा
अन पळस
शोभे हासरा
वृक्ष वर्धन
नको दहन
वृक्षारोपण
वन जतन
जाळून टाकू
हेवे दाव्याला
मिळे आनंद
सदा मनाला
आज रंगाचा.
आला तो सण
मनेआनंदी
झालेत जन
फुले फुलली
निसर्ग सारा
पीत बहवा
फुलला न्यारा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा