22/3/22
अष्टाक्षरी काव्यलेखन
*स्पर्धेसाठी*
विषय - झाड शोधे सावलीला
झाडे लावा
आली आता तीच स्थिती
नका तोडू वनश्रीला
दिसेनाशी झाली छाया
*झाडे शोधे सावलीला*
प्रगतीच्या नावाखाली
नको करु वृक्षतोड
मानवाचा वाढे लोभ
वृक्षासवे नाते जोड
मुळे शोषती जलाला
देती मेघ नभाकडे
बरसता जलधारा
वृक्ष दिसे चोहीकडे
वृक्ष वल्लरी हवीच
पथिकाला देण्या छाया
थकलेल्या जना हवी
थंड सावलीची माया
होता नाशची वृक्षाचा
कोण कोणा देई छाया
*झाडे शोधी सावलीला*
दिसे न प्रेमळ माया
वैशाली वर्तक
अहमदाबाद
*स्पर्धेसाठी*
साकव्य स्पर्धा क्रमांक ४४
सौ प्रज्ञा मिरासदार यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
विषय. ... निसर्गाची साद
काव्य प्रकार
शीर्षक...झाड शोधे सावलीला
आली आता तीच स्थिती
नका तोडू वनश्रीला
दिसेनाशी झाली छाया
*झाडे शोधे सावलीला*
फार प्रगत होताना
नको करु वृक्षतोड
ध्यानी घे पर्यावरण
वृक्षासवे नाते जोड
मुळे शोषती जलाला
देती मेघ नभाकडे
बरसता जलधारा
वृक्ष दिसे चोहीकडे
वृक्ष वल्लरी हवीच
पथिकाला देण्या छाया
थकलेल्या जना हवी
थंड सावलीची माया
माझा नसे कदा कोप
मानवाचा अती लोभ
प्रगतीच्या नावाखाली
थांबवना आता क्षोभ .
होता नाशची वृक्षाचा
कोण? कोणा? देई छाया
*झाडे शोधी सावलीला*
दिसे न प्रेमळ माया
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा