सावली प्रकाशन समूह आयोजित
उपक्रमासाठी
विषय - स्वतःच्या फोटोवर काव्य
प्रसन्न व्यक्तीमत्व
आहे माझी साधी रहाणी
पण व्यक्तीमत्व आकर्षक
रंग संगतीची आवड
रूप दिसते चित्त वेधक
रंग साडीचा केशरी
सोनेरी काठ पदर
चेहरा असे सदा हसरा
हास्य दावीती ते अधर
गळा शोभतो हार
उजळलेले दिसे रूप
कानी चमकी कर्ण फूले
मोहक भासे सौंदर्य खूप
मुखावर भाव हसरे
शांत निर्मळ व्यक्तीमत्व
भासे सोज्वळ सौंदर्य
चार लोकात दावी प्रभुत्व
बांधेसुद असे शरीर
सौंदर्यात करी भर
आनंदी समाधानी वृत्ती
दिसुन येते खरोखर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सावली प्रकाशन समूह आयोजित
उपक्रमासाठी
विषय - स्वतःच्या फोटोवर काव्य रचना
माझे व्यक्तीमत्व
उठूनी सकाळी लवकर
उभारण्या मांगल्याची गुढी
घडवितेय दर्शन संस्कृती चे
चालविण्या परंपरेची रुढी
नथ नाकी, गळा तन्मणी
शोभे साधे रुप मनोहर
व्यक्तिमत्व खुलते मराठी
शोभून दिसतेय खरोखर
महाराष्ट्रा बाहेर राहूनी
केलय संस्कृती चे जतन
मराठ मोळी नारी मी
भाषेसह वाचवितेय , मराठीपण
घेऊनी संगत नातवाला
देते सहज ज्ञान सणवाराचे
पहा कशी रुबाबात ऊभी
दर्शन घडते गुढी पाडव्याचे
वृषभ रास असता माझी
सदा आनंद मुखावरी
साधे पण टापटीप रहाणे
आहे भाग्यवान मी खरी
उठूनी सकाळी लवकर
उभारण्या मांगल्याची गुढी
घडवितेय दर्शन संस्कृती
चालविण्या परंपरेची रुढी
नथ नाकी, गळा तन्मणी
शोभे साधे रुप मनोहर
व्यक्तिमत्व खुलते मराठी
शोभून दिसतेय खरोखर
महाराष्ट्रा बाहेर राहूनी
केलय संस्कृती चे जतन
मराठ मोळी नारी मी
भाषेसह वाचवितेय , मराठीपण
घेऊनी संगत नातवाला
देते सहज ज्ञान सणवाराचे
पहा कशी रुबाबात
ऊभी
दर्शन घडते गुढी पाडव्याचे
वृषभ रास असता माझी
सदा आनंद मुखावरी
साधे पण टापटीप रहाणे
आहे
भाग्यवान मी खरी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा