अभा म सा प ठाणे जिल्हा 2
काव्य लेखन उपक्रम
विषय - सांगू कसे तुला
देवा दयाधना रे
तू तर अंतर्यामी
जाणून घे ना व्यथा
सांगू कसे तुला मी
मी काय सांगणार
तुला असतेच जाण
तूची कर्ता करविता
तव मर्जीनेच हले पान
घडू दे भेटी आप्त जनांची
कर सारे जग पूर्ववत
दूर कर आता महामारी
काम करण्या अविरत
सांगू कसे तुला
करिते आता विनवणी
शरण आले तुजला
समजून घे मनोमनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा