सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

बलिदान

अ भा म सा प समूह2
उपक्रम 360
विषय - बलिदान


स्वातंत्र्याच्या लढ्यात 
झाले शहीद जवान
 बलिदानाचे  जाणा मोल
भारत मातेचे  ते वीर महान

केली नाही पर्वा घरदाराची
ओतियले   वीरांनी पंचप्राण
  पारतंत्र्य  घालविण्यासाठी
 केले  सर्वस्वाचे बलिदान 

  
  इतिहास सांगतो त्यांची ख्याति
  स्वातंत्र्य  वीर आहेत  अगणिक
  समजावून सांगु त्यांची कीर्ती 
  कळेल  महती  ऐतिहासिक 
 
   नुसते वंदन करुनी दोनदिस
होत नसे उपकार फेड सहज
जाणा महत्त्व  स्वातंत्र्याचे
 आहे आज तीच गरज

वैशाली वर्तक
अहमदाबाद

आठोळी काव्य
     स्पर्धे साठी........
     स्वातंत्र्य प्राप्ती हे सदा ध्येय 
     मनांत त्याच विचारांचे थैमान
     हसत गेले फासावरी वीर
     सुपुत्र झाले शहीद महान.

     दहशत वाद्यांच्या विरोधात 
     रक्त सांडूनी करितात बलिदान
     आनंदे  स्वीकारती वीर मरण
     भारतभूचे सैनिक  जवान.

       जय हिंद    
     वैशाली वर्तक

प्रयत्न

सावली प्रकाशन समूह
विषय - प्रयत्न 

करिता प्रयत्न  अतोनात
यश संपादन  हे खचित
करणे परीश्रम सफळतेसाठी 
प्रयत्नांती परमेश्वर हेच उचित

प्रयत्नांची पराकाष्ठा
सदा करावीच लागते
येते तेव्हाची यश हाती
यश च महती सांगते

पूर्ण  करितो जाळे स्वतःचे 
कामात व्यस्त राही सतत
पडून खाली अनेकदा
करितो कोळी प्रयत्न अविरत


मात करीता अडचणींना
प्रयत्नांना मिळाली चाहुल
तेनसिंगने केली पूर्ण मनीच्छा
एवरेस्ट वर टाकून  यशाचे पाऊल.

अशी महती प्रयत्नांची 
म्हण आहेच ती खरी
प्रयत्ने रगडीता तेल गळे
यत्न  देती उज्वल यश भरजरी.
यत्न देती उज्वल यश खरोखरी


शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

तू तिथे मी

सावली प्रकाशन समूहआयोजित उपक्रम
*उपक्रमासाठी*
विषय - तू तिथे मी   २८/१/२२
    *आस मनीची*

सुमनांचा गंध कधीच
 दूर, न होई खचित
तैसे *तू तिथे मी*
रहाणार सदोदित

आहे तसेच आपले 
दोन तने एक मन
विसर  पडे  ,  न कदा
 जीवा एकही क्षण

रहावे तू मम संगती
असेच वाटते मनात
साथ हवी  निरंतर
 हीच आस अंतरात     3

येते नभी चांदणी
वाट पहाते चंद्राची
तैसे *तू तिथे मी*
असणार सदाची   4

  कशी जगेल मासोळी
  जला विना पळभर
 तुझ्या अस्तित्वाने
   दिसे  दिशा खरोखर   5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

सिंधुताई सकपाळ ....हरपली अनाथांची माय

हरपली अनाथांची माय

असा कसा आला दिन आज
कुठल्या शब्दात सांगू काय
निःशब्द  झाले सारे जन
*हरपली अनाथांची माय*     1

स्वतःचे जीवन संघर्ष मय
प्रसंगी   चितेवर शेकली भाकरी
लेकरांना मात्र देऊनी घास 
अश्रू पिऊनी केली चाकरी     2

कर्तृत्वात कधी न राहिली मागे
लहान थोरांची झाली माई
आई होऊनी तू जगलीस
 तुमचे  कार्य महान  सिंधुताई   3

 बांधली अनाथाश्रम ,वस्ती गृह
अनाथांचे  केले मायेने संरक्षण
आई बनली त्या बेवारसांची
 बांधले  वर्ध्याला केंद्र गोरक्षण   4

किती तव साधी रहाणी
घडविला  तू नवा  इतिहास
जगाला भावली विचार  सरणी
अनाथांना दिला मुखी घास          5


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
  


शनिवार, २२ जानेवारी, २०२२

आष्टाक्षरी आरंभ

आ भा म स प कल्याण डोंबिवली महानगरसमूह 
उपक्रमासाठी  22/1/22
विषय - आरंभ

देतो मनाला आनंद
शब्द उच्चार आरंभ
करण्यास सुरुवात
कुठल्याही समारंभ

घेता निर्णय कामाचा
दिन असो कुठलाही 
सत्कर्माला  सदाकाळ
नसे अडथळा काही


स्मरुनिया गणेशाला
करा आरंंभ कार्याचा
तोची असे विघ्नेश्वर
 कार्य सिध्दि करण्याचा

अथ ते इती कामाच्या
मनी ठेवावा विश्वास
पूर्ण  होणारच काम
हाच ठेवू मनी ध्यास



वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

वाट धुक्यात हरवली अखंडिकल्याणकारी काव्य

*स्पर्धेसाठी*
अखंडिकल्याणकारीकाव्यसमुह २
आयोजित  राज्यस्तरिय काव्य स्पर्धा
काव्यप्रकार - अखंडित कल्याणकारी
दि. २१/१/२२
विषय - वाट धुक्यात हरवली
      *किमया रवीराजांची*

वाट धुक्यात हरवली
हरवली ती दाsट धुक्यात
धुक्यात येऊन किरणांनी रवीने
रवीने दूर  सारली  येऊन नभात     १

नभात आभा, रवीच्या पसरल्या
पसरल्या दूरवर दावण्या वाट
वाट तरी  पहा  , दिसतच   नसे 
नसे तो ऊषेचा रम्यसा थाट              २

थाट पहात चालताना झुळुक वाहे
वाहे मंद- मंद शीतल  वात
वात असल्याने पक्षी गण विसरले
विसरले,  झालेली रम्य पहाट           ३

पहाट होतीच, सुंदर  धुंदमंद
धुंदमंद पहाटेला, दवबिंदू वनोवनी
वनोवनी पर्णे गुज सांगती
सांगती अलवार, आनंदे मनोमनी       ४

मनोमनी मी ही, झाले खुश ,
खुश होता आली सर पावसाची
पावसाची सर झेलत चालता 
चालता दूर  झाली वाट धुक्याची.       ५

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 









21/1/22

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

दत्तगुरू त्रिमूर्ती अवतार

सावली प्रकाशन समूह
षडाक्षरी उपक्रम
विषय - दत्तगुरू
    
*त्रिमूर्ती अवतार*

दत्त  दिगंबर
दैवत मानावे
नित्य नियमित
स्मरण करावे        १

ब्रह्मा शिव विष्णू 
मार्गशीष मास
सत्व परिक्षेस
आले होते खास       २

ब्रह्मा विष्णू  शिव
त्रिमूर्ती प्रतिक
दत्त गुरू असे 
ध्यान अलौकिक    ३

मुखी घेता नाम
दत्त दिगंबर
दुःख  दूर जाते 
सदा निरंतर           ४

अवधूत रूप
शंख चक्र धारी
औंदुबर वासी
भव दुःख  सारी        ५


गुरु दत्तात्रय
त्रिमूर्ती दयाळु
जटाजुटशिरी
आहेत कृपाळु            ६

पाहूनी प्रेमळ 
सात्त्विक  त्रिमूर्ती
आनंदाने मनी
हास्य उमलती             ७

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...