सावली प्रकाशन समूह
षडाक्षरी उपक्रम
विषय - दत्तगुरू
*त्रिमूर्ती अवतार*
दत्त दिगंबर
दैवत मानावे
नित्य नियमित
स्मरण करावे १
ब्रह्मा शिव विष्णू
मार्गशीष मास
सत्व परिक्षेस
आले होते खास २
ब्रह्मा विष्णू शिव
त्रिमूर्ती प्रतिक
दत्त गुरू असे
ध्यान अलौकिक ३
मुखी घेता नाम
दत्त दिगंबर
दुःख दूर जाते
सदा निरंतर ४
अवधूत रूप
शंख चक्र धारी
औंदुबर वासी
भव दुःख सारी ५
गुरु दत्तात्रय
त्रिमूर्ती दयाळु
जटाजुटशिरी
आहेत कृपाळु ६
पाहूनी प्रेमळ
सात्त्विक त्रिमूर्ती
आनंदाने मनी
हास्य उमलती ७
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा