*स्पर्धेसाठी*
अखंडिकल्याणकारीकाव्यसमुह २
आयोजित राज्यस्तरिय काव्य स्पर्धा
काव्यप्रकार - अखंडित कल्याणकारी
दि. २१/१/२२
विषय - वाट धुक्यात हरवली
*किमया रवीराजांची*
वाट धुक्यात हरवली
हरवली ती दाsट धुक्यात
धुक्यात येऊन किरणांनी रवीने
रवीने दूर सारली येऊन नभात १
नभात आभा, रवीच्या पसरल्या
पसरल्या दूरवर दावण्या वाट
वाट तरी पहा , दिसतच नसे
नसे तो ऊषेचा रम्यसा थाट २
थाट पहात चालताना झुळुक वाहे
वाहे मंद- मंद शीतल वात
वात असल्याने पक्षी गण विसरले
विसरले, झालेली रम्य पहाट ३
पहाट होतीच, सुंदर धुंदमंद
धुंदमंद पहाटेला, दवबिंदू वनोवनी
वनोवनी पर्णे गुज सांगती
सांगती अलवार, आनंदे मनोमनी ४
मनोमनी मी ही, झाले खुश ,
खुश होता आली सर पावसाची
पावसाची सर झेलत चालता
चालता दूर झाली वाट धुक्याची. ५
वैशाली वर्तक
अहमदाबाद
21/1/22
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा