शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

अष्टाक्षरी आक्रोश

 प्रजित साहित्यिक  समुह 

आयोजित  अष्टाक्षरी

विषय - आक्रोश


नको करूस आक्रोश 

काय करणार  साध्य?

उगा आरडा ओरडा

रहाणार ते असाध्य.


नको करु खंत उगा

तुझा तूच शिल्पकार 

हवे प्रयत्न  झटूनी

कर जीवन साकार


 निशे नंतर सकाळ

येते नित्यची नेमाने

धरा रडते का कधी

संपताच प्रकाशाने


राजे नाही बसलेत

कधी आक्रोश करीत

स्वप्न मनी हिंदवीचे

पूर्ण   केलेत त्वरीत


देता जन्म अर्भकास

होतो आक्रोश थोडासा

पण पहाताच बाळ

मिळे तिजला दिलासा


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

म्हणीवरुन. ...... पळसाला पाने तीन


 अ भा म सा प  समूह02आयोजित

दैनंदिनकाव्य लेखन  उपक्रम 

विषय -- पळसाला पाने तीन

    * *परिस्थिती एकच*


परिस्थिती  एक असे 

हेची दिसे सभोवती

*पळसाला पाने तीन*

जाता कुठे ही जगती


असता स्वभावाने तापट

मग जा कुठेही जगात

रहातो तो तसाच जीवनात

होतो  थोडा फार कमी प्रमाणात


समुद्राचे पाणी असे खारट

मग जा शोधत  कुठेही जगभर

उगा का म्हणती जन

नका करु विचार त्याचा क्षणभर


कावळा म्हटला की तो काळाच

मग असेना थंड प्रदेशात

बदल नाही  घडत कोठेही

कावळ्याच्या काळ्या रंगात


जगण्यास आवश्यक प्राणवायु

मग  जाता शिखरावर

सर्व  प्राणीमात्रास हवा तोची

  जळी स्थळी जगाच्या पाठीवर


मानवाच्या रक्ताचा रंग लाल

तयात नाही बदल जातीभेदात

जगात कुठेही जा शोधण्यास 

फरक नाही रक्ताच्या रंगात


वैशाली वर्तक

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

धुक्यात हरवली वाट

 शब्दांकुर साहित्य  समूहउपक्रमासाठी

*धुक्यात हरवली वाट*

     

    *धुक्याची वाट*

आले रवीराज नभी

दूर करीत  धुक्याची

सोनसळी शलाकांनी

शाल तलम  नभीची



जरी आभा पसरल्या

धुक्यात हरवली वाट

दूरवर दिसत नसे

सकाळचा रम्य थाट


चालत होते दूरवर

वाहे मंद शीतल वात

पक्षी गण पण विसरले

झालेली रम्य पहाट


अशा मंद धुंद  समयी

दवबिंदु  पानोपानी

 गुज सांगती पर्णांना

हळुवार  मनोमनी


मधेच हलकी सर 

 हळुवार  पावसाची

हरवलेली वाट दिसे

दूर  करिता  धुक्याची


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

बालकविता .... होडी

माझी  लेखणी = 2
माझी  लेखणी साहित्य  समूह 
आयोजित  उपक्रम 
काव्य लेखन
बालकविता
विषय - होडी

   *माझी जलपरी*

पावसात भिजण्याची
 पूरी करु आज हौस
सरीवर सरी येती
आला रे मोठा पाऊस


फाडा वहीची ती पाने
करु कागदाच्या  होड्या
सोडू पाण्यात  तयांना
मस्ती करु ,थोड्या खोड्या


पुढे गेली पहा कशी वेगात.     गेली पहा कशी वेगात 
नाही तिला अडवू शके वारा.    नाही जुमानत वारा
माझी  होडी चाले डौलात.      चाले होडी माझी डौलाने 
पडता  कितीही वर्षा धारा.      पडो कितीही वर्षा धारा

होडी माझी  पोहचली
सर्व  होड्यांच्या  अगोदर
बनवली होती तिला मीच
घेऊन कागद तो सुंदर 

नाव  मी  दिले तिला 
माझ्या  आवडीचे *जलपरी*
आहे ना खरोखर पहा
नावा प्रमाणे   जल सुंदरी

कसे केले मनोरंजन
छोट्याश्या   मम होडीने
या एकदा तुम्ही  पण
सफर करवीन सवडीने

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

षडाक्षरी माती

प्रजित साहित्यिक समूह
षडाक्षरी काव्य रचना
उपक्रमासाठी
विषय -- माती
   
   *मातीचीच माया*

माती असे माय
जन्मतो कुशीत
  देते अन्न  वस्त्र 
ठेवते खुशीत                1

मातीत रुजता 
बीज अंकुरते
हिरवे शिवार 
मना संतोषते                 2

बळी करी प्रेम 
काळ्या मातीवर
कुरवाळे प्रेम 
जीव तिच्यावर               3

मातीच्या गोळ्याला 
देऊन आकार 
 घट बनवून
कलेला साकार                 4

मातीत जन्मतो
मातीतच अंत
मातीच संभाळी
नको मनी खंत                  5

पडता पाऊस
मातीचा सुगंध
तेव्हा अत्तराचा
फिका वाटे गंध             6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

१रिता मनाचा गाभारा/२मनगुंतवू कोठे/ ३रित्या मनाच्या अंगणी


*रिता मनाचा गाभारा*
जन्म मिळाला मानव
मेंदू केलाय बहाल
करु जीवन  सार्थक
पाहू जगाची कमाल

गोळ्या समान मातीच्या
मन  होते निर्वीकार
 केले संस्कार  मातेने
होउनिया  शिल्पकार 

रिता मनाचा गाभारा
सजे मोहाने मायेने
जसे वाढे वयमान
भरे तो  सहजतेने  

 सुख   भोगिले भौतिक  
येता काळ यौवनाचा
मन आनंदे  भरले 
भरे. गाभारा मनाचा

मन  जाहले संतृप्त
 येता सांज आयुष्याची
आशा  आकांक्षा नुरली
झाली  जाणीव देवाची 

धरी कास अध्यात्माची
मिळविले  समाधान
रित्या मनाच्या गाभा-या
उमजले, भाग्यवान

वैशाली वर्तक
अहमदाबाद 








साहित्य दर्पण कला मंच नागपूर
आयोजित उपक्रम क्रमांक ७९
२विषय ..मन गुंतवू कुठे

जन्म मिळाला मानव
मेंदू केलाय बहाल
करु जीवन  सार्थक
पाहू जगाची कमाल

गोळ्या समान मातीच्या
मन  होते निर्वीकार
 केले संस्कार  मातेने
होउनिया  शिल्पकार 

रिता मनाचा गाभारा
सजला मोह मायेने
जसे वाढे वयमान
भरे तो  सहजतेने  

 सुख  भोगिले भौतिक
येता काळ यौवनाचा
मन आनंदे  भरिले
भरे गाभारा मनाचा

मन  जाहले संतृप्त
येता सांज आयुष्याची
आशा  आकांक्षा नुरली
झाली  जाणीव देवाची 

 
मन गुंतविले नाम स्मरणात 
मिळविण्या समाधान
कास मना अध्यात्माची
ज्ञात होई  मीच भाग्यवान


वैशाली वर्तक
अहमदाबाद


काव्य निनाद साहित्य राष्ट्रीय मंच पुणे 
३विषय.  खोल मनाच्या अंगणी

 *मनाच्या गाभाऱ्यात* 

रिता मनाचा गाभारा
सजे मोहाने मायेने
जसे वाढे वयमान
भरे तो  सहजतेने  

 असे मातीचाच गोळा 
 संस्कार  रूजती मनी 
दूर राखण्या षडरिपु
  खोल मनाच्या अंगणी 

 धरा कास अध्यात्माची
मिळवावे  समाधान
रित्या मनाच्या गाभा-या
  उमजे स्वतः. भाग्यवान

  
 माणुसकी, सौजन्याने 
  असावा वहाणारा  झरा
  मनाच्या अंगणी सदा
 जीवनात कामी येतो खरा 

   मनाच्या  या अंगणात 
  जाण ठेवावी  देवाची
नित्य आठवण हवी
मनी त्याच्या चरणांची

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


रोजच्या चित्र काव्य , चारोळ्या

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...