माझी लेखणी = 2
माझी लेखणी साहित्य समूह
आयोजित उपक्रम
काव्य लेखन
बालकविता
विषय - होडी
*माझी जलपरी*
पावसात भिजण्याची
पूरी करु आज हौस
सरीवर सरी येती
आला रे मोठा पाऊस
फाडा वहीची ती पाने
करु कागदाच्या होड्या
सोडू पाण्यात तयांना
मस्ती करु ,थोड्या खोड्या
पुढे गेली पहा कशी वेगात. गेली पहा कशी वेगात
नाही तिला अडवू शके वारा. नाही जुमानत वारा
माझी होडी चाले डौलात. चाले होडी माझी डौलाने
पडता कितीही वर्षा धारा. पडो कितीही वर्षा धारा
होडी माझी पोहचली
सर्व होड्यांच्या अगोदर
बनवली होती तिला मीच
घेऊन कागद तो सुंदर
नाव मी दिले तिला
माझ्या आवडीचे *जलपरी*
आहे ना खरोखर पहा
नावा प्रमाणे जल सुंदरी
कसे केले मनोरंजन
छोट्याश्या मम होडीने
या एकदा तुम्ही पण
सफर करवीन सवडीने
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा