शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

अष्टाक्षरी आक्रोश

 प्रजित साहित्यिक  समुह 

आयोजित  अष्टाक्षरी

विषय - आक्रोश


नको करूस आक्रोश 

काय करणार  साध्य?

उगा आरडा ओरडा

रहाणार ते असाध्य.


नको करु खंत उगा

तुझा तूच शिल्पकार 

हवे प्रयत्न  झटूनी

कर जीवन साकार


 निशे नंतर सकाळ

येते नित्यची नेमाने

धरा रडते का कधी

संपताच प्रकाशाने


राजे नाही बसलेत

कधी आक्रोश करीत

स्वप्न मनी हिंदवीचे

पूर्ण   केलेत त्वरीत


देता जन्म अर्भकास

होतो आक्रोश थोडासा

पण पहाताच बाळ

मिळे तिजला दिलासा


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...