शब्दांकुर साहित्य समूहउपक्रमासाठी
*धुक्यात हरवली वाट*
*धुक्याची वाट*
आले रवीराज नभी
दूर करीत धुक्याची
सोनसळी शलाकांनी
शाल तलम नभीची
जरी आभा पसरल्या
धुक्यात हरवली वाट
दूरवर दिसत नसे
सकाळचा रम्य थाट
चालत होते दूरवर
वाहे मंद शीतल वात
पक्षी गण पण विसरले
झालेली रम्य पहाट
अशा मंद धुंद समयी
दवबिंदु पानोपानी
गुज सांगती पर्णांना
हळुवार मनोमनी
मधेच हलकी सर
हळुवार पावसाची
हरवलेली वाट दिसे
दूर करिता धुक्याची
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा