रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

समजून घ्यायला हवे

काव्यस्पंदन राज्यस्तरीय समूह 02
साप्ताहिक काव्य लेखन स्पर्धा 
मुक्तछंद काव्य लेखन स्पर्धा 
विषय - समजून घ्यायला हवे

      *हवा समजूदारपणा*

काय म्हणलात तुम्ही ?
*समजून घ्यायला हवे*
अहो , हे काय सांगणे झाले ?
त्यात काय सांगितलं नवे!

जीवनात हवीच तडजोड
 नको आपलाच अट्टाहास
म्हणजेच समजून घ्यावे इतरांना
नाहीतर होतो आपलाच उपहास

आपलीच  नका लादू मते
 ऐकावी  कधीतरी  कुटुंबियांचे
एकमेकांशी  होता विचार  विनीमय
असते   ते सर्वदा फायद्याचे 

*समजून घ्यायला हवे*
हेच तर आहे जीवनाचे सार
होते मैत्री , जुळतात मन
नको आपल्याच मतांचा भार

सारस्वतात तसेच स्वातंत्र्यवीरांत
असतातच ना  मतभेद अनेक
समजून घेतात एकमेकांना 
कारण ध्येय मात्र  असते  एक


वैशाली वर्तक 
अहमदाबाद











चित्र काव्य

काव्य  रचना 

चित्र काव्य

काव्य रचना 

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

वृक्षारोपण

माझी  लेखणी - काव्य नगरी मंच
चित्र काव्य
शीर्षक  *वृक्षारोपण*


नको   -हास  वनांचा
करुया वृक्षा रोपण
करा जतन सृष्टी चे
सुधारण्या पर्यावरण

निगा राखा तरु लतांची
  वृक्ष असती  सखे सोयरी
जिणे होईल  नाहीतर कठीण 
प्राणवायु देती वृक्ष  वल्लरी

  थांबवा प्रगतीच्या  नावाने
  जंगल वने तोडण्याचा क्षोभ
   होत आहे निसर्गाचा -हास
मानवाचा वाढलाय लोभ

पक्षी जलचर कुठे जातील
नका ओढावू वरुणाचा रोष
कसे कसेल शेत बळीराजा
पावसाला नका देऊ दोष

वृक्ष ची देती आपणा सावली
थकलेल्या पथिकास छाया
अन्नवस्त्र  देती निवारा
वृक्ष च करती सदैव माया



वैशाली वर्तक 
अहमदाबाद






गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

अष्टाक्षरी मार्ग दुर्गम

काव्यस्पंदन 
अष्टाक्षरी

कसा नागमोडी मार्ग 
दिसतोय काळाशार 
रहदारी तुरळक
कधी करणार पार


सावलीचे नाही नाव
आहे रूक्षता भकास
नाही ओलावा पाण्याचा
दगडांची भारी रास

मार्ग  आहेच दुर्गम
नाही कुठेच वर्दळ
थांबण्यास न ठिकाण
रस्ता मात्र तो नितळ


कुठे  मैदाने सपाट
येथे खडक दुस्तर
निसर्गाची ही किमया
आहे पहा खरोखर

एका बाजूस  रस्त्याने 
कडे कपारी अपार
घाट आहे वळणाचा
 अवघड  वाट फार


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

श्रावणी सोमवार. भोलेनाथ

शब्दरजनी साहित्य  समूह
विषय - श्रावण सोमवार
*स्पर्धेसाठी*
      *भोलेनाथ*

असे पावन श्रावण
सोमवार त्यात खास
सर्व  सणांचा महिमा
शिव शुंभुचा हमखास    1


बिल्वपत्र वाही शिवा
 भक्त सारे होती गोळा
उपवास करी जन
 भासे  मंदीरी सोहळा    2

सोमवारी शिवामुठ
नामजप बेलपान
ओम नमः शिवाय
ऐकता हरपते भान 3

सोमवार आवडीचा
शाळा सुटे लवकर
शिवालया जाण्यासाठी 
होउ तयार भरभर   4

भक्ती भावे पुजू शंकरा
करु नित्य आराधना
होई प्रसन्न  महादेव
आळविता त्याची प्रार्थना  5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

छंद मजला निसर्गाचा

छंद असती अनेक
कुणा असे लिखाणाचा
कुणी नादिष्ट गायनाचा
छंद मजला निसर्गाचा 

छंद असे विरंगुळा
मना मिळतो आनंद
वेळ जातो सहजच
नित्य जपावे छंद


रोजचाच सुर्योदय
पाही मी नवीनतेने
भासती किती छटा
रंगते  सृष्टी सहजतेने

 कलिका होती रात्रीत
  उमलते कशी अलवार 
 गंध पसरतो आसमंती
  फूल हसते हळुवार 

समुद्राच्या  लाटा येती
भेटण्या किना-यास उफाळून
येता किनारा लाट ती
चूर चूर होई लाजून

उषःकाल होता ऐकते
किलबिलती पहा पक्षी
कशी जाती विहरत
दिसे  नभी सुंदर  नक्षी

निसर्गच खरा चित्रकार
सृष्टीवर दृश्य अविरत
रंगवी तयांना मनोहर
मोद देई सदा खचित


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...