छंद असती अनेक
कुणा असे लिखाणाचा
कुणी नादिष्ट गायनाचा
छंद मजला निसर्गाचा
छंद असे विरंगुळा
मना मिळतो आनंद
वेळ जातो सहजच
नित्य जपावे छंद
रोजचाच सुर्योदय
पाही मी नवीनतेने
भासती किती छटा
रंगते सृष्टी सहजतेने
कलिका होती रात्रीत
उमलते कशी अलवार
गंध पसरतो आसमंती
फूल हसते हळुवार
समुद्राच्या लाटा येती
भेटण्या किना-यास उफाळून
येता किनारा लाट ती
चूर चूर होई लाजून
उषःकाल होता ऐकते
किलबिलती पहा पक्षी
कशी जाती विहरत
दिसे नभी सुंदर नक्षी
निसर्गच खरा चित्रकार
सृष्टीवर दृश्य अविरत
रंगवी तयांना मनोहर
मोद देई सदा खचित
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा