काव्यस्पंदन राज्यस्तरीय समूह 02
साप्ताहिक काव्य लेखन स्पर्धा
मुक्तछंद काव्य लेखन स्पर्धा
विषय - समजून घ्यायला हवे
*हवा समजूदारपणा*
काय म्हणलात तुम्ही ?
*समजून घ्यायला हवे*
अहो , हे काय सांगणे झाले ?
त्यात काय सांगितलं नवे!
जीवनात हवीच तडजोड
नको आपलाच अट्टाहास
म्हणजेच समजून घ्यावे इतरांना
नाहीतर होतो आपलाच उपहास
आपलीच नका लादू मते
ऐकावी कधीतरी कुटुंबियांचे
एकमेकांशी होता विचार विनीमय
असते ते सर्वदा फायद्याचे
*समजून घ्यायला हवे*
हेच तर आहे जीवनाचे सार
होते मैत्री , जुळतात मन
नको आपल्याच मतांचा भार
सारस्वतात तसेच स्वातंत्र्यवीरांत
होतेच ना मतभेद अनेक
समजून घेतले एकमेकांना
कारण ध्येय मात्र होते एक
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा