बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

फुलपाखरु चित्र काव्य. फुलपाखरु

आ भा म सा परिषद  समूह 02
उपक्रम  56
चित्र  काव्य -- 
       
शीर्षक ः *सुंदर फुलपाखरु*


किती सुंदर  फुलपाखरु
पाहताच  आकर्षते मनाला
सदा साठी मोहक दिसे
 लुब्ध करते सर्व जनाला

लाल रंगात  छटा भारी
ठिपक्यांची नक्षी त्यावरी
कोणीही सुंदर  नसे भुवरी
 पाहून तया वाटे क्षणभरी

चपळता किती पहा तरी
जागा बदली हर क्षणाला
म्हणूनच उपमा देती त्याची  
सारे जन तयांच्या मनाला

किती लहान जीव त्याचा
असे अल्पायुषी जरी
रंगात दावी   विविधता
आनंद देत सदा विहरी

सहजच देई संदेश जगाला
 जीवन नसे कदा निरर्थक
लुटावा परिमळ मोदाचा
तयातच जीवनाचे सार्थक

वैशाली वर्तक

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

मज राहवले नाही......ओढ

लेखणी माझी देखणी समूह आयोजित 
जेष्ठ गझलकार  स्व किरण जोगळेकर 
जयंती विशेष  काव्य लेखन  महास्पर्धा
फेरी क्र  .1

  ओळ काव्य -मज राहवले नाही

   शीर्षक - *ओढ*

भेट आपुली  पहिली
 *मज  नाही राहवले*
माझ्या  विचलित मना   
तूची   मज सावरले           1


पहिल्याच भेटीतला
वाटे अश्वासक   स्पर्श 
 दिले अनामिक सुख
देतो मना सदा हर्ष            2

छंद तुला  बघण्याचा
कसे आवरु मनाला
तुझाओझरता स्पर्श 
वेड लावितो जीवाला        3 

गंध तुझ्याच  प्रीतीचा
सदा   रहातो अंतरी 
रोज वसंत फुलेल       
 विश्वासाने ऊर भरी           4

सख्या येता सांजवेळ
उजळती आठवणी
मज नाही रहावले
प्रीत गंध स्मरे  मनी          5                             


LMD 37

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

सहाक्षरी क्षणभर थांब

काव्य स्पंदन  राज्यस्तरीय  समूह 02
काव्य स्पंदनी रविवारीय  स्पर्धा
काव्य प्रकार - षडाक्षरी 
विषय - क्षणभर थांब 

     *निवांत*
किती पळशील
 सदा जीवनात
क्षणभर थांब
जरा निवांतात      1

बघ उगवता
सूर्य  गगनात
न्याहाळ तयाच्या
प्रभा आनंदात       2

पहा झुळुझुळु
वाहे तो निर्झर
 निनाद ऐकण्या
थांब   क्षणभर      3

सांजवेळी बघ
नभातील पक्षी
किती मनोहर
दिसतेय नक्षी        4

येता रवि नभी 
कळ्या अलवार
फुलूनी डौलती
 फुले  हळुवार       5

मोहक मोगरा 
फुलला पानात
गंध दरवळे
पहा क्षणार्धात          6

सृष्टीची किमया
पहा  खरोखर 
क्षणभर थांब
आहे मनोहर          6
 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

पंचाक्षरी पुस्तक

रोही पंचाक्षरी समूह आयोजित 
रोही पंचाक्षरी काव्य स्पर्धा

विषय - पुस्तक

करा वाचन
सदा पठण
ते अज्ञानाचे
करे हरण          1


ज्ञानाची खाण
अगाध छान
पुस्तकातील 
घ्यावे हो ज्ञान       2

वाचावे ग्रंथ
सांगती संत
मिळवा ज्ञान
मिळे सुपंथ         3

मनीची आस
हवा हो ध्यास
वाचनालय
त्यासाठी खास      4

नसे लहान
असे महान
पुस्तकं देते
जगी सन्मान      5

असे सोबती
करी गंमती
वाचनासाठी
नको संमती        6

मनोरंजन
बुध्दी व्यंजन
ज्ञान वर्धन
मानती जन           7

येताची घरी
पुस्तक  करी
आनंद वाटे
तो क्षणभरी    8

वैशाली वर्तक

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

नक्षत्र वेल अनमोल भेट

नक्षत्र वेल
         *अनमोल भेट*

    दिली आई वडिलांनी 
    जपण्यास निरंतर
   संस्काराची मज भेट
    अनमोल खरोखर

  सदा करावे वाचन
  लेखणीत हवी गती
   सेवा करण्या  भाषेची
   दिली  आईनेच  मती 
   
    
   करा नित्याने व्यायाम    
   हवी  कला  अवगत
  वडिलांनी पोहण्यात
   केले  मला पारंगत 

   देई साथ जीवनात
   माझा सखा साथीदार
   अनमोल भेट रूपी
  त्याचे महत्व अपार

  अनमोल या भेटींनी
  माझा  संसार फुलला
  काय  अजूनी ते हवे
  सांग देवा तू मजला

वैशाली वर्तक

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

अबोला


अबोला

बालपणी खेळतांना
झाले नाही मनाजोगे
कट्टी बट्टी ती मित्रांशी
 साध्य करण्या त्या  योगे

पण अबोला मनोवृत्ती 
जात नाही अशी तशी
उफळून येते मनामधे
एका झटक्या सरशी


जीव लागतो टांगणीला
नव-याशी अबोला धरिता
काय हव ते सांग  बाई
पण बोलणे , बंद न करिता

राग आला तर व्हावे व्यक्त
संवादाने स्पष्ट  कळते सारे
अबोल्याने वाढे गैरसमज
बोलण्याने होते कसे न्यारे

सर्व  नात्यातच नको अबोला
बोलणे हीच युक्ती नामी
मनातील विचार  जाणण्या
आबोला सोडणे  येते कामी

वैशाली वर्तक

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

हृदयी वसंत फुलला

मसामं बोरीवली विभाग
विषय -- हृदयी वसंत फुलला

दिधले अनामिक सुख 
अश्वासक प्रेमळ स्पर्शाने
करी धुंद अजूनी जीवास 
मन मोहरते  हर्षाने


गंध तुझ्या  प्रीतीचा
दरवळे  सदा अंतरी
रोज वसंत फुललेला
अनुराग सदाची उरी.


सहज सख्या सांजवेळी
उजळती  आठवणी
दिन येती ते नजरेस 
प्रीत गंधित होते मनी


राखिला  सदैव मान  
 साथ देत सहजीवनात
सौभाग्ये सर्व  मिळाले
वसंत फुलला हृदयात

वैशाली वर्तक

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...