सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

सहाक्षरी क्षणभर थांब

काव्य स्पंदन  राज्यस्तरीय  समूह 02
काव्य स्पंदनी रविवारीय  स्पर्धा
काव्य प्रकार - षडाक्षरी 
विषय - क्षणभर थांब 

     *निवांत*
किती पळशील
 सदा जीवनात
क्षणभर थांब
जरा निवांतात      1

बघ उगवता
सूर्य  गगनात
न्याहाळ तयाच्या
प्रभा आनंदात       2

पहा झुळुझुळु
वाहे तो निर्झर
 निनाद ऐकण्या
थांब   क्षणभर      3

सांजवेळी बघ
नभातील पक्षी
किती मनोहर
दिसतेय नक्षी        4

येता रवि नभी 
कळ्या अलवार
फुलूनी डौलती
 फुले  हळुवार       5

मोहक मोगरा 
फुलला पानात
गंध दरवळे
पहा क्षणार्धात          6

सृष्टीची किमया
पहा  खरोखर 
क्षणभर थांब
आहे मनोहर          6
 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...