लेखणी माझी देखणी समूह आयोजित
जेष्ठ गझलकार स्व किरण जोगळेकर
जयंती विशेष काव्य लेखन महास्पर्धा
फेरी क्र .1
ओळ काव्य -मज राहवले नाही
शीर्षक - *ओढ*
भेट आपुली पहिली
*मज नाही राहवले*
माझ्या विचलित मना
तूची मज सावरले 1
पहिल्याच भेटीतला
वाटे अश्वासक स्पर्श
दिले अनामिक सुख
देतो मना सदा हर्ष 2
छंद तुला बघण्याचा
कसे आवरु मनाला
तुझाओझरता स्पर्श
वेड लावितो जीवाला 3
गंध तुझ्याच प्रीतीचा
सदा रहातो अंतरी
रोज वसंत फुलेल
विश्वासाने ऊर भरी 4
सख्या येता सांजवेळ
उजळती आठवणी
मज नाही रहावले
प्रीत गंध स्मरे मनी 5
LMD 37
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा