अबोला
बालपणी खेळतांना
झाले नाही मनाजोगे
कट्टी बट्टी ती मित्रांशी
साध्य करण्या त्या योगे
पण अबोला मनोवृत्ती
जात नाही अशी तशी
उफळून येते मनामधे
एका झटक्या सरशी
जीव लागतो टांगणीला
नव-याशी अबोला धरिता
काय हव ते सांग बाई
पण बोलणे , बंद न करिता
राग आला तर व्हावे व्यक्त
संवादाने स्पष्ट कळते सारे
अबोल्याने वाढे गैरसमज
बोलण्याने होते कसे न्यारे
सर्व नात्यातच नको अबोला
बोलणे हीच युक्ती नामी
मनातील विचार जाणण्या
आबोला सोडणे येते कामी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा