रमणीय यामिनी
आनंद कंद वृत्तांत प्रयत्न
रमणीय यामिनी
आनंद कंद वृत्तांत प्रयत्न
हे चक्र नित्य चाले, तेजाळ त्या रवीचे,
दिन संपता जगाचा, मुख उजळले शशीचे.
लाजून चांदण्या त्या, आल्या नभांगणाशी
अन् फेर नाचताना, आभाळ ही प्रकाशी.
रात्रीस खेळ चाले, त्या चंद्र चांदण्याचा
रजनीस नाद होता , हर्षात रंगण्याचा.
शीतल अशी हवा ही , भासे सुखद तनाला
या चांदण्यात होई, अनुभव नवा मनाला.
कुजबूज पर्ण संगे, कलिका हसून पाही
झाली फुले कळयांची, लहरीत गंध वाही.
वाटे निवांत व्हावे, वाऱ्या सवे फिरावे
नेत्रात यामिनीला, जवळून अनुभवावे.
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा