रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

आनंद कंद वृत्तांत. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

 गागाल गालगागा. गागाल गालगागा

आनंद कंद वृत्तात

 


वाटे सुखद जिवाला, रमणीय स्थान बघता,

बसलो मिळून दोघे, एकांत क्षण गवसता!


सांगे अनिल मनीषा, माझे मला कळेना 

सरलीत पंच दशके, कैसी कशी स्मरेना


आहे अजून ध्यानी ,अवधी पवित्रतेची

स्मृती सुखात राहो, नात्यात शुद्धतेची


हातात हात ऐसा विश्वास सोबतीचा,

संसार हा सुखाचा,सहवास संगतीचा


मागे वळून बघता, ओठात शब्द आले

देवा असो कृपा रे,सहचर्य धन्य झाले


वैशाली वर्तक




2212 122 2212 122


*वाटे* सुखद जिवाला, रमणीय स्थान बघता,

बसलो मिळून दोघे, एकांत क्षण *गवसता*


सांगे अनिल मनीषा, माझे मला कळेना 

*सरलीत पंच दशके, कैसी कशी स्मरेना*


आहे अजून ध्यानी ,अवधी *पवित्रतेची*

स्मृती सुखात राहो, *नात्यात शुद्धतेची*


हातात हात *ऐसा*, विश्वास सोबतीचा,

संसार हा सुखाचा,*सहवास संगतीचा*


मागे वळून *बघता*, ओठात शब्द आले

देवा *असो कृपा रे*,*सहचर्य* धन्य झाले




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आनंद कंद वृत्तांत. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

 गागाल गालगागा. गागाल गालगागा आनंद कंद वृत्तात   वाटे सुखद जिवाला, रमणीय स्थान बघता, बसलो मिळून दोघे, एकांत क्षण गवसता! सांगे अनिल मनीषा, मा...