मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित
उपक्रम
विषय कोरडी ही माया
शीर्षक.
आहे सध्याचे जीवन
निव्वळ ते दिखाव्याचे
नाही कशातच तथ्य
पोकळ प्रेम दाखवायचे
नाटकी हास्य सदा
नाही लवलेश भाव
खोटा मुखवटा मुखी
दिसे प्रेमाचा अभाव
शब्द खोटे दिलासाचे
खोटे खोटे आश्वासन
पूर्ण करत नाही कधीच
दिलेले सहज वचन
सध्या खरे चेहरे कमी
कमी दिसतात जगात
मुखावटा घालून फिरे
फिरे बिनधास्त जोमात
खरे प्रेमच नुरले
कोरडी पडली माया
खोटे अश्रू ढाळताती
न दिसे प्रेमळ छाया
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा