स्पर्धेसाठी
कमलविश्व राज्यस्तर स्पर्धा साहित्य समूह
आयोजित मासिक भव्य राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा
माहे ऑक्टोबर 2026
31/10/26
विषय ...सेवा पूर्ती
शीर्षक. तृप्ती आणि विरहाचा क्षण
होऊनिया पदवीधर
सुरू केले अर्थार्जन
पहाता पहाता आला
सेवा पूर्ती चा क्षण.
अन्नदाती समजून
केली सेवा निष्ठेने
व्यवहारी ज्ञानी झाले
जीवनात कटाक्षाने;
किती वर्षे केली सेवा
त्याची होई उजळणी
गप्पांतून मन भरले
जाग्या झाल्या आठवणी
सूरू झाले गुणगान
उभी रहाता भाषणास
डोळे आता पाणावले
मी नि:शब्द वदण्यास
अशी जाहली सेवापूर्ती
शेवटचा दिवस आला,
तृप्ती आणि विरहाचा
अनोखा संगम जाहला.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8141427430
,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा