बुधवार, ६ मे, २०२६

वृत्त लवंगलता ... मात्रा ८-८-८--४. सय गावाची

फक्त वृत्तबद्ध कविता उपक्रमा साठी
वृत्त लवंगलता. (८-८-८-४)
*सय गावाची*

फक्त वृत्तबद्ध कविता उपक्रमा साठी
वृत्त लवंगलता. (८-८-८-४)
*सय गावाची*

सहज पहाता चित्र गावाचे मन आनंदे  नाचे
 जाईन कधी  माझ्या गावी आठवण मनी  गाचे.      

 गावी येता  छोटी छोटी  टुमदार घरे दिसली      
 किती मजेचे दिन ते होते मनातून सय आली

भरून  गाड्या धावत होत्या.धान्ये विकण्या साठी.  
 खुशी खुशीने कृषक चाले  फेरीगाडया  पाठी 
 
गोरज समयी  पहा चरूनी  परतली गुरे गोठा
 चित्र रम्य किती पाहून मनी  मोद जाहला मोठा.
                                 .   
  नभ ता-यांचे जसे भासले सुपात लाह्या गावी
  होताच निशा यामिनी पहा शोभनीय रुप दावी

 किती मजेचे वाटे फिरणे  बैलगाडीत  बसता
वर्दळ नाही मौज आगळी  अनुभवानंद  मिळता

वाटे हेची  जीवन सुंदर आहे जगण्या साठी
 रोज बसावे. निवांत समयी शीतल सरिते काठी.

कशाला हवा  खोटा भपका  नकोच शहरी जीणे 
गावच माझा मला   विचारे   गावात काय ऊणे?


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

परिचारिका

जगाचा पोशिंदा समूह आयोजित उपक्रम  दि ७\५\२६ विषय परिचारिका  सेवा रूग्णांची करणे गुणाने असे मायाळु नसे ठाऊक आराम स्वभावाने ती दयाळु परिचारिका...