बुधवार, २१ जानेवारी, २०२६

ती न संपणारी कविता

शब्द रजनी साहित्य समूह 
विषय ..ती एक न संपणारी कविता 
21/1/26

आहे खरच तू अशी
सदा  चाले अविरत 
नसे ठावुक थांबणे 
धावे सदा अखंडित 

 शांत बसता उपवनी 
 पाहूनी पर्णे डोलती 
 भासती जणु मनात 
हर्षे टाळ्या वाजवती.

सवय जडली अंतरंगी 
 करु सदा शब्दाविष्कार
हर क्षणी देती उपमा
भाषेतील शब्दालंकार


 विषयाची नुरते गरज
 वेळ प्रसंग देती विषय
शब्दांना गुंफता काव्यात 
लक्षात घेतेच आशय


नाते जडले लेखणीशी 
झालेय जीवन कविता 
 करण्या तिज अजून देखणी 
राहो ती सदा प्रवाहिता

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
21/1/26

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...