लेख लेखन स्पर्धा
विषय ..ऑन लाईन शाॅपींग
अगं बाई!उशीर झाला आज उठायला. घाईने चहाचे आधण ठेवत. फ्रीज मधून दूध बाहेर काढत आणि दूध .गरम करायला गॅसवर ठेवले तर पहाते तर काय ! बाईssबाई दूध नासल की! चहा कसा होणार आणि तो डीप डीप चहा तर अजिबात आवडत नाही . त्यापेक्षा गरम पाणी पिणे परवडले. असे विमलताई बडबडल्या.
तेवढ्यात सून विभावरी आली म्हणाली ,"नका काळजी करू.आता ८ व्या मिनीटात
दूध येईल. Blinkit सेवेला आहेना! मग काळजी कसली!
आणि खरच आधणात साखर, किसून आले,व चहा टाकस्तोवर दारात दूधाच्या पिशव्या हजर.
असे सुख या online खरेदीने प्राप्त झाले आहे. शरीरास कष्ट न देता ,धावपळ न करता सहज वस्तू हजर होत आहेत. त्यात अमूक एक रकमेची खरेदी केली तर आणणावळ पण लागत नाही.
तसे online खरेदी ने घरा बाहेर जाणे नको .वेहिकल चालवणे नको, पेट्रोल ची बचत. हे सुखावहच झाले आहे. तसेच किराणा माल कपडे खरेदी, साडी , ड्रेस वगैरेची पण online खरेदी छान होते.
रंग नाही मना सारखा अथवा माप नाही योग्य, तर बदलून पण वा आवडली नाही वस्तू तर परत पण घेतली जाते.
मग सध्याचे जनरेशन काय.. वा जे आधुनिक टेक्नॉलॉजीशी समरस झाले आहेत ते सारे वाटच पहात असतात. आणि खुशीने online खरेदी करत आहेत. व online खरेदीला प्रोत्साहन देत आहेत.
पण स्वतः हून बाजारात जाऊन वस्तू वा कापड पारखून घेणे , खूप निवड करण्याची संधी, सा-या जातीच्या व. अनेक प्रकारचे सामान् हाताळताना हवे तेवढा खरेदीला choice. मिळणे. हे प्रत्यक्ष खरेदी तच मिळत, जसे एका साडी शी 10/12 साड्या वा ड्रेस... हे प्रत्यक्ष खरेदी तच शक्य होत असते.
दुकानदारांशी बोलून भाव कमी जास्त , करून..धासाधिशी. करुन ,कसे आपण विक्रेत्या स आपल्याला हव्या त्या किमतीत वस्तू घेतलीचा आनंद.... online मधे मिळत नाही,
आणल्यानंतर खरेदीतील मजा रंगवून सांगण्याची मजा तर प्रत्यक्ष खरेदीतच येते.
जसे लग्न कार्याची खरेदी... सर्वांना बरोबर घेऊन केलेल्या खरेदी ची मजा काही आगळीच .
शिवाय विंडोज शॉपिंग ची प्रत्यक्ष जाऊन पायपीट करून,दहा दुकान पालथी घालत शेवटी कंटाळून काही पण न घेता परत यावे
आणि. घरी एसीत बसल्या बसल्या मुलीने. आपण बाजारात पाहिलेली वस्तू सहज आपण. यावयाच्या आत टेबलावर online खरेदी ने केलेली पहावी. तेव्हा online खरेदी झिंदाबाद शब्द तोंडातून निघतात.
तर असे आहे. पण online खरेदीत. मोबाईल हाताळण्यात काळजी ध्यावी लागते.सध्या मोबाईल fraud वाढत आहेत. त्याची नीट काळजी घेणे जरुरीचे आहे.
उगाच आपला नंबर इथे तिथे झाला तर आपली सारी माहिती... नको तिथे मिळते व fraud होतात.
पण बदल हवाच ना. विज्ञानाची प्रगती अनुभवली तर पाहिजे च ना,
पण या online खरेदीने छोटे व्यापारी दुकानदार यांचे नुकसान होत आहे,
सहज माल हाती मिळत असल्याने दुकानात विक्री कमी होते. पण हे सारे
व्यापार चक्र आहे ...असे चालतच राहणार.
जमानेके साथ चालना चाहिए ना .
वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा