लालित्य नक्षत्रवेल समूह आयोजित
ललित लेखन
विषय... कर्णफुले
कर्णफुले कानात हवीच त्या विण चेहरा कसा भकास भासतो. मला तर बांगड्या गळ्यातली पेक्षा कानातली याची फार हौस .........हौस नाही, तर हव्यास म्हणा. ...मला म्हणजे सर्वच बायकांना असतोच..खरी सोन्याची तर सध्याच्या काळात घेणे परवडत नाही तरी 10/12तर असतातच . शिवाय नकली तर आकर्षक व सुंदर. आजकाल अमाप मिळतात.
आपल्यात तर मुलगा असो मुलगी कान विंधवणे. कान टोचणे प्रकार असतोच. जन्मा नंतर 10/12 व्या दिवशी कान विंधविण्यात येतात . तेव्हा सुंकले हा पहिला कानाचा दागिना. कानात घातल्याने , बाळाच्या चेहऱ्यात, दिसण्या तर लगेच फरक पडतो. शेवटी दागिनाच...तो.! अलंकार.... शृंगार शरीराचा वाढविणारच. !
तर अशा रितीने पुढे मुली चौकुला. कुड्या. कुडयांव्यतीरिक्त कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर, बाळी, वेल,सोन्याचे कान यांसारखे आभूषणेही कानात घातले जातात. याचे पारंपारिक नाव झुबे असे आहे. सतराव्या शतकाच्या आधीपासून हे प्रचलित आहेत.
तर सांगायचे काय मला कर्णफुलांची फार आवड. नवीन लग्न ठरले होते . लग्ना आधीचे फिरणे म्हणजे लाड पुरवून घेणे व नव-याने पण लाड पुरवण्यात मागे न पडणे . असेच फिरायला गेलो होतो.
यांनी कौतुकाने विचारले घ्यायची कानाची आभुषणे.... मी उगा नको नको म्हटले. पण कानतली पाहून मन रहावलेच नाही. यांनीच त्यांचा आवडीचे निवडले. आणि काय ! त्यांची आवड छान आहे कळले.
डूल प्रकारातील पसंत केली.
पसंत करून थांबले नाहीत तर चक्क दुकानात त्यांनीच माझ्या कानात घालून फिरकी पण लाव ssली.
व अशी नजर रोखून पहात होते की. ... त्यांच्या सुंदरीला कवेत घेणारी की काय !
हो आमच्या वेळेचा काळ होता. ..सध्याचा काळात तर तेही शक्य आहे म्हणा.
पण खरच कर्णफुले शोभून दिसत होती. तेवढ्यात मी पण लहान मुली सारखी २\४ दा माना वेळावून आरशात स्वतःला निरखून पाहिले. शेवटी यांनी पण पुढे पुढे. येणाऱ्या.. माझ्या लाडिक बटांना कानामागे करण्याची व अनाहुत स्पर्श करण्याची संधी सोडली नाही.
ती कर्णफुले आजतागायत मी जपली आहेत. एकतर लग्ना आधीची पहिली भेट. ती नुसती कर्णफुले नसून पहिल्या भेटीची सदा आठवण करून देतात. त्यानंतर अनेक कुड्या काय झुंबरे काय खड्याची काय!
इतकं नव्हे तर सुंदर नव्या नव्या आकर्षक डिझाईन ची. मस्कत ची पण ४\५ आणलीत
सर्व वापरली पण ती लग्ना आधीची कर्णफुले अजून मीच वापरते. कारण त्या कर्णफुलात दुकानात ते विकत घेतानाच्या आठवणी दडलेल्या आहेत ना!
वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा