शनिवार, २९ मार्च, २०२५

चित्र काव्य


 सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक ५२५
विषय... चित्र काव्यलेखन 
शीर्षक..

किती खुष झालीय
आनंद दिसे मुखावरी
झेलतेय रेशीम धारा
पडण्या आधीच भूमीवरी

डोळे  घेतले मिटून
हसतमुखे पसरून हात
थेंब ओधळती गालावर 
झाली ग्रीष्म झळांची मात

विसरली माळलेल्या
सुमनांचा गंध क्षणात
मृद्गंध पसरता सर्वत्र
दवबिंदू सवे आसमंतात


रक्त वर्णी कंकण  हाती
लाल  साडीचोळी परिधान
लाली आली गालावर 
 चेहऱ्यावर दिसे समाधान

थंड शीतल झोंबे वारा
करी कंपित तन मनाला
शहारली काया जल बिंदूंनी
 मन  होई थेंब झेलायाला.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...