यारिया साहित्य कला समूह
विषय -- पतंग
शोभिवंत तू विविध रंगात
लहान मोठे अनेक आकार
दोन साध्या काड्या जोडूनी
झाले बघ तव रुप साकार
हलका फुलका तू नाजूक
होतो वा-यावरती स्वार
उंच गगनी घेत भरारी
क्षणात ढगांना करिशी पार
दोरीची तुजला सदा साथ
जीवन नौका तिच्या हातात
संभाळीते तीच तव भार
करविते सफर गगनात
मधूनच डोकावी ढगातूनी
थंडगार सुखकर वा-यात
दिसे तव रुप अती मनोहर
भासे विहरता खग नभात
कधी मारीशी सूर नभी
जशी मासोळी पाण्यात
लगेच तो-यात मान काढूनी
सर सर भरारी घेतो गगनात
तुटता दोरी , सहवेना विरह
भरारी घेत रममाण नभात
सुटता दोरीची साथ तुझी
हताश होता दोघे क्षणात
वैशाली वर्तक
अ भा म सा प स्वप्नगंध समूह
उपक्रम षडाक्षरी काव्य लेखन
विषय . -- पतंगाचा दोर
*साथ दोरीची*
पतंगाची दोर
सदैवच साथी
पतंग नभात
दोर राही हाती 1
पतंग ,दोरीच्या
बळावर स्वार
ढगांना करीतो
क्षणार्धात पार 2
जीवन नौकाच
दोरीच्या हातात
तीच करविते
सफर नभात 3
.\
ढिल देता जाई
उंच गगनात
जणु भासे खग
विहरे नभात 4
पहा कसा मारी
सूर तो नभात
जणु की, मासोळी
ती जलाशयात 5
मान वर काढी
लगेच तो-यात
सरसर घेई
भरारी नभात 6
पतंगाचा दोर
तुटता नभात
साथ संपताच
उदास क्षणात 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा