Alien ka मराठी प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा
क्रमांक 28
विषय.. . कर्तृत्व
शीर्षक....जाण कर्तृत्वाची
मातापिता घडविती
संस्काराने आपणास
घडा कर्तृत्वाचा ठरे
महत्वाचा प्रत्येकास.
वृत्ती हवीच धाडसी
वाव मिळे कर्तृत्वाला
ईच्छा शक्ती मनातील
वाट दाखवी यशाला
यौवनाचा काळ असे
घडविण्या कर्तृत्वाचा
आशा ,आकांक्षा, अपेक्षा
पुरिपूर्ण करण्याचा.
संधी येता जीवनात
कर्तृत्वाने घ्या भरारी
सोने करिता संधीचे
यश येईलच दारी
वाचा गाथा शिवबांची
कर्तृत्वाच्या बळावर
केले हिंदवी स्वराज्य
वंदनीय खरोखर.
वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा