झोप 28/12/24
झोपे सारखे सुख नाही
वाटे डुलकी घ्यावी थोडी
मिळते मनास विश्रांती
झोप शब्दातच भासे गोडी
करू मस्त आराम
ताणुन देऊया छान
पडता झोप लागे लगेचच
असे तो खरा भाग्यवान
झोप हवीच सर्वांना
असे जरुरी शरीरास
कमी झोपेने ,अस्वस्थ मन.
देई आमंत्रण व्याधींना खास
लवकर उठावे सकाळी
म्हणताती जरी , जन सारी
सकाळच्या साखर झोपेची
मजाच असते ती न्यारी
विद्यार्थी दशेत असताना
झोप येई अनावर आवर्जून
झोपेला तेव्हा अव्हेरण्याचे
दु:ख वाटे मनापासून
रविवार तर खास झोपण्याचा
घड्याळाला करून दुर्लक्षित
सकाळी उशिरा पर्यंत झोपण्या
असतो ठेवलेल्या सुरक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा