गुरुवार, २ जानेवारी, २०२५

बाराक्षरी स्मरण..नवीन उभारी \

 नाम घ्यावे सदा ,मुखी राघवाचे

करितो सार्थक ,तोची जीवनाचे


लावा तया नामे,अंतरीचा दिवा

क्षालन करण्या, वाईट कर्माचे

भुरळ  पाडे  ती , षडरिपू जिवा

मनन चिंतन ,करा ईश्वराचे         १


बळे बळें  चित्त कोठेची  रमेना

नामस्मरणात सुख ते मिळाले

उठता मनीं वादळ विचारांचे

मन समाधाने प्रसन्न जहाले.     २


मार्गची दिसेना, जीवन तरण्या

मन अडकता  , संसार सागरी

विचार छळती सदैव संसारी

कशा मिळतील ,सुखाच्या घागरी


तोची जगी असे, कर्ता करविता

लाभावे भाग्यची ,मज दर्शनाचे

शरणची आले, तुज भगवंता

उजळेल मम ,भाग्य जीवनाचे







स्पर्धेसाठी 

मोरणा कार्यशाळा चौकट बद्ध बाराक्षरी उपकाव्य प्रकार 

स्पर्धा क्रमांक 1

दि 12/1/24

विषय ... नवीन उभारी 

शिर्षक.   जीवनी भरारी 



उंच नभातला पाहूनी पतंग            

मनी देत असे सदैव उमंग 


    इच्छाशक्ती हवी, मनात यशाची 

    जीवाला देतसे *नवीन उभारी*    

    उंच उडणा-या  पतंगा सारखे.       

    पंख पसरूनी घेऊया भरारी      


    चढाव उतार , येणार जीवनी

    सुखाची अपेक्षा नको सदोदित   

    मन लावुनिया करिता प्रयत्न    ‍ 

   उज्वल यश येणारच खचित   


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...