विश्व लेखकांचे समूह आयोजित
दिलेल्या शब्दांचा वापर करून अष्टाक्षरी काव्यलेखन
शब्द ,,,,, अंतर पान घायाळ अबोला मोह पाऊस सांज गंध मोहर
पुरावा पालवी बांध चंद्र मन राग रंग दाह पहाट प्रेम जीव मोगरा
शीर्षक,,,,आल्या मृग धारा
अती *दाह* आदित्याचा
भेगाळली पृथ्वी काया
सहवेना वसुधेला
शोधी सारे जन छाया
काळ्या रंगाच्या मेघांनी
आले भरून गगन
मृग *धारा* बरसता
आनंदले जन *मन*
तृप्त झाली वसुंधरा
होता वरुणाची भेट
वृक्षवल्ली तरारल्या
अंतरंगी दिसे थेट
*मोह* कसा आवरु मी
मनी भावतो *पाऊस*
*गंध* पसरे मातीचा
भिजण्याची मनी हौस.
झाली बघ *सांज* आता
*चंद्र* नभी उगवला
मंद सुगंधी *मोगरा*
पानो पानी डोकावला.
किती वर्णु मृग धारा.
शब्द पडती तोकडे
होता सुरू ऋतू वर्षा
हिरवाई चोहीकडे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा