कान्हा तो मुरारी !
गोकुळीचा गिरीधारी
राधिका होई बावरी!
2. कान्हा च्या बासरीत
लागताच ध्यान
राधिकचे सदासाठी
हरपते भान !
3. राधिका कान्ह्याची
करिते मंथन !
कृष्ण !कृष्णची
बोलती कंकण !
4. राधेचा कान्हा तो
वाजवीता पावा !
गोकुळीच्या मोहनचा
करी जन धावा !
5. सोडिता गोकुळ !
विनवी राधिका!
सोड अक्रुरा कान्हा
कोसती गोपिका !
6. असा गोड पावा !
वाजविता कान्हा !
बासरीने गोकुळात
फुटे गाईंना पान्हा !
7. पहा गोकुळात कान्हा
खेळ खेळे राधे संग
आनंदात रंगलेला
रंग खेळण्यात दंग
8. विसरूनी मी तू पण
कान्हा राधा झाले दंग
देहभान विसरुनी
रंगी रंगला श्रीरंग
9. मुरलीचा येता सूर
होई राधिका बावरी
रंगी रंगे कान्हाच्या
वेड लावे तो श्रीहरी
10. दावी धरा रंगोत्सव
येता पहा हा वसंत
सृष्टी पहा बहुरंगी
रंगी राधा कान्हा हसत
11. भेदभाव सारु दूर.
जैसा खेळे तो श्रीरंग
राधेच्या कान्हा सम
आनंदात होऊ दंग
12. पहा मूर्तीमंत प्रेम
असे भक्तीचे प्रतिक
रंगी रंगता प्रेम ते
राधा कान्ह्याचे सात्विक
13. राधिकेच कान्हा
वसे तो अंतरी
तया वीण तिचा
दुजा नसे हरी
14. वेड लागले राधेला
. पाही जळी स्थळी हरी
कान्हा विण नको तिज
कान्हा कान्हा नावच अधरी
15. जळी स्थळी पाही राधा
कान्हा हाची एकमात्र
दुजा कोणी न तिजला
दिसे श्यामच सर्वत्र
16. ध्यानी मनी तो कान्हा
मनी देवकी नंदन
हरी नाम सदा मुखी
जरी करिता मंथन
17. अविरत करी राधा
सदा मनीचे चिंतन
कृष्ण कृष्णची शब्द ते
सदा बोलती कंकण
18. सावळ बाधा राधेला
होई राधिका बावरी
कान्हावरी तो भाळिली
मुरलीचा तो मुरारी
19. नाद मुरलीचा ऐकता
राधा हरपते भान
गोप गोपिका सवे
कान्हा कडे तिचे ध्यान
20. गोकुळाची तहान भुक
हरपते कान्हाची बासरी
मोहनची छबी पाहण्यासाठी
होई राधा गौळण बावरी
21 भुल पडे या राधेला
कान्हा संगे येता क्षणभरी
. कशी आवरु मनाला
मन गुंतते तुझ्याच अंतरी
22. जाता आम्ही मथुरेच्या वाटेवरी
दही दुध लोणी घेउनी बाजारी
वाट अडवितो खट्याळ कान्हा
गोपिकांना राधेला. छळतो भारी
23. दही दुधाची कान्हा करि चोरी
सवंगडी संगे मटकी फोडी
संभाळ ग यशोदे कान्हाला
राधा सांगे तयाची खोडी
24. जळी स्थळी
राधा पाही
दिसे कान्हा
दुजा नाही
25. राधे लागे
कान्हा छंद
तिला मिळे
स्वर्गानंद
26. कान्हा सवे
येता क्षणी
सुखावते
राधामनी
27. त्या राधेच्या
चिंतनात
कान्हा नाद
कंकणात
28, नको नेऊ
मथुरेस
तू आक्रुरा
श्रीकृष्णास.
29. कान्हासाठी
ती राधिका
कोसताती
त्या गोपिका
30. कैसे कंठु
एक दिन
कान्हाविण
राधा क्षीण
31 वेड लावे
कान्हा भारी
राधा भोळी
ती बावरी
32. प्रेमभक्ती
चे प्रतिक
कान्हा राधा
ते सात्त्विक
33 वृंदावनी ती खेळे
हरीचा संग
राधा मुरारी
खेळण्यात ची दंग
34. भाळली कान्हावरी
कुजबुजती गोपिका
हरीचा संगती सदा
रममाण राधिका
36. आज गोकुळात
रंग खेळे गोपिका
कान्हाने रंगविता
बावरली राधिका
37. अडविते राधा
नको टाकू रंग
कान्हा तर झाला
आनंदात दंग
38. अडविता कान्हाला
खेळताना राधा
पण नुउमजे तिला
झालीय कृष्ण बाधा
39. जन हसताती सारे
वाट सोड क्षणभर
किती छळतो राधेला
थट्टा कान्हा पुरे कर
40. चित्त चोर कान्हा
वाट सदा रोकतो
विनवणी न ऐकता
सवंगडी सह छळतो
41. गोपिका सांगती राधेला
नको जाऊ गोकुळाला
कृष्ण बाधा झालेली
कशी ऐकणार ती ग्वाला
42. कान्हा संगती येता राधा
मन होई पुलकित
विसरते काम मनीचे
असेच होई सदोदित
43. उगा मुकुंदा छळु नकोस
राधेला छळण्यात कसली गोडी
मटकी फोडता भिजते साडी
असली कसली कान्हा खोडी
43 सोड वाट.राधेच्या कान्हा
उशीर होतो बाजाराला
पुरे कर तुझ्या खोड्या
जाऊ दे रे नंदलाला
44 नको ना पाडू भुरळ
संगती येता क्षणभर
ओढ लागे राधेच्या मना
विनविते कान्ह्याला खरोखर
45. कृष्ण वाजवी पावा
बावरी होई राधा
पाहता वळूनी कळे
प्रीतीची तीज झाली बाधा
46. रंग खेळतोय
कान्हा गोकुळात
गोपीका सांगती
राधा ,बस तू घरात
47. आज चाले रंगोत्सव
रंगी रंगला श्रीरंग
राधिकेचा कान्हा पहा
रंग खेळण्यात दंग
48. चटोर चित्त चोर कान्हा
रंग टाकतो हात पकडूनी
रंगवेल तुलाही राधिका
गोपिका सांगती समजावूनी
49. किती समजावू तूज
विनविती तिज गोपिका
कान्हाचे वेड लागता
कशी ऐकल राधिका
50. कोणी न राहिले रंगा विण
रंग खेळले गोकुळी आज
राधेचा कान्हा दोघेही तयात
प्रत्येकाला रंगाची साज
51. रंग खेळता खेळता
जमला गरबा रासचा खेळ
रात्र भर राधेचा कान्हाचा
गेला खेळण्यात वेळ
52. ढोल ताश्याचा आवाजात
वाजली कान्हाची बासरी
नाद येता कानी राधिका
शोधे ,कुठे आहे श्रीहरी?
53 राधेच्या कान्ह्याची
मधूर बासरी
वेड लावी जिवा
असा तो श्रीहरी
54. होती मंत्र मुग्ध स्वरे
पक्षी प्राणी जन सारे
राधेच्या कान्हाचा पावा
वाजवी मधूर न्यारे
55. राधा गवळण
करीते मंथन
नवनीत काढी
कान्हा चे चिंतन
56. मंथनात स्वर येती
कृष्ण कृष्ण अविरत
वाटे नवल जनांना
राधेच्या कान्ह्याचे
57. भाळली कान्हयावर
गवळण राधिका
करिती कुजबुज
सा-याची गोपिका
58. यशोदा मातेला
करिती गा-हाणी
राधेचा कान्हा तो
ऐकू येई कानी
59. वाट सोड कान्हा
देवकीच्या नंदलाला
जाऊ देना बिगीबिगी
राधा गेली बाजाराला
60. सवंगडी सह राधेचा कान्हा
करी दही दुधाची चोरी
गवळणी जाई कंटाळून
वर करी शिरजोरी
61. राधा गवळण
झालीय बावरी
नको कान्हा धरू
अंधेरी बासरी
62. सूर ऐकताच
नकळत भान
लागते न चित्त
विसरते भान
63. नको जाऊ कान्हा
सोडून गोकुळ
राधिका गोपिका
होतील व्याकुळ
64. कान्हा विण कैसी
राहिल राधिका
झाली तिज बाधा
वदती गोपिका
65. सावळ्या कान्हयाचे
राधेला लागले पिसे ग
न कळे मनास तिजला
आवरू कसे आता ग
66. येता ऐकण्यात जेव्हा
राधेला कान्ह्याचा पावा
विचलित होई मनाने
करी मनी त्याचा धावा
67. खोडसाळ कान्हा राधेचा
हलवितो तरू लतांना
आलाच तिजला वाटे
फसे राधा त्या क्षणांना
68 खुपते शेज राधेला
. कान्हा गोकुळी जाता
येई न नीज तिजला
मनी सय कान्हाची येता
69. पहा मूर्ती मंत प्रेम
असे भक्तीचे प्रतिक
राधा व कान्ह्याचे असे
प्रेम दोघांचे सात्विक
70 मंत्र मुग्ध होई राधा
जळी स्थळी पाही कृष्णा
देहभान विसरून
कान्हा दर्शनाची तृष्णा
71. दर्पणाला घेता हाती
कान्हयाचेच दिसे मुख
राधा चिंतते एकची
त्यात मिळे तिज सुख
71. राधेला घाली गजरा
बाजूला ठेवून बासरी
मोरपीस शोभे शिरी
भान हरपून राधा बावरी
72. दुध दही लोणी
घेऊनी बाजारी
कान्ह्याची राधा
गोकुळची ती नारी
72. राधेच्या कान्ह्याचे
. प्रेमच आगळे l
आहे सर्वाहून l
जगी या वेगळे l
73. कान्हा तो राधेचा l
आत्मा एकरुप l
पहा अव्दैताचा l
प्रगटला दीप l
74. ध्यानी मनी असे कान्हा
मनी देवकी नंदन
राधेच्या सदा मुखी
जरी करिता मंथन
75. राधा ती कान्हाची
करिते मंथन
अविरत कान्हा चे
मनात चिंतन
76. प्रेम आगळे राधा कान्ह्याचे
जळी स्थळी त्यालाच पहाते
भेटी साठी मन राधेचे
सदा सर्वदा झुरत रहाते
77. कान्ह्याच्या राधेविण
चालतांना मंथन
नवल पहाण्या येती
सारे गोकुळ जन
78. ध्यान कान्हाच्या राधेचे
असे करिता मंथन
दृष्टी पुढची सदैव
मात्र देवकी नंदन
79. राधेच्या कान्ह्याचा
जन्मोत्सव आज
घराघरांतून
दिसतोय साज
80. पडता रिमझिम पाऊस
न दिसता राधेला मोहन
होई कावरे बावरे
कान्हाच्या राधेचे मन
81 हाक मारी कान्ह्याला
गुंजती मंजुळ तिचे चूडे
राधा होऊनी अगतिक
वाटे तिज पाहू कुणी कुडे
82. जलाशयाच्या प्रतिबिंबी
दिसता कान्हा राधेला
पाही हसत तयाकडे
सीमा न उरे आनंदाला
चाराक्षरी.......
83 विश्वरुप
पाही मैया
राधेचाच
तो "कन्हैया"
84. राधाकृष्ण राधाकृष्ण
गजर चाले मंदिरी
आगळाच उत्साह
दिसे जनांच्या अंतरी
85. कान्हा गोकुळ जाता
झाली राधा उदास
परि मनी तियेच्या
भेटीचा सदा ध्यास
86. वेड लावी कान्हाची
बासरी गोकुळाला
राधिका गोपिकांना
आवडे तो नंदलाला
87. सुदर्शन चक्र हाती
केला दुष्टांचा संहार
राधेच्या कान्हयाच्या
गळा शोभे वैजयंती हार
88. मोरपीस पावा चक्र
पाहताच कान्ह्याचे नाव
अंधेरी येते राधेचा शाम
सर्वांना असेच ठाव
89. मोरपीस शोभे शिरी
निलवर्णी कान्हाची कांती
चित्ती राधिकेच्या वसता
मग कसली राधेला भ्रांती
90. देवकीचा आठवा पुत्र
कृष्ण वाढे नंदा घरी
गोपिका राधिकेचा कान्हा
प्रेम भाव सदा उरी
91. रुप पाहूनी सावळे
तयाचे. हसरे मोहक
जन वदती कृष्ण
राधेचा कान्हा चित्त वेधक
92. देवकी पुत्र आणिला गोकुळी
नंद यशोदाची आनंदली नगरी
तोची राधेचा कान्हा
युगपुरुष ठरला सर्वा अंतरी
93. वसुदेव देवकी पुत्र
नंद यशोदा करी पालन
गवळण राधेचा कान्हा
गोकुळात. तोची मनमोहन
94. कान्हा कान्हा नावाचा
राधेला लागला छंद
त्यांच्या मुलीचे वेड
मनोमनी चित्त त्यात दंग
95. सवंगडीचा कान्हा
खेळ खेळती यमुना तीरी
गोप गोपिका सवे राधिका
मोरपीस लावे कान्हाशिरी
96. राधा गोपिका जमता
वृंदावनी रंगे खेळ
राधेच्या कान्हा चा
बासरी वादनात जाई वेळ
97. आज चारोळीच्या योगे
कृष्ण राधा नाव
आले सर्वाच्या ओठी
हे नाही कुणा ठाव
98. लिहिता प्रत्येक चारोळी
राधेचा कान्ह्याचे रटण
झाले सर्वांकडून आता
करु भक्ती भावे नमन
99. सदा बासरी अधरी
गोड कान्ह्याची बासरी
सूर ऐकता तियेचे
राधा होतसे बावरी
100. वेड लावी सूर जीवांना
राधे संग खेळ खेळी कान्हा
पक्षी पण होती मंत्र मुग्ध
गाईंना फुटे प्रेमे पान्हा
101. द्रौपदीचा असे तो सखा
धावा करी ती संकटाला
त्वरित येई राधेचा कान्हा
सदा तत्पर तिच्या रक्षणाला
जय श्रीकृष्ण
वैशाली वर्तक
अहमदाबाद 8141427430
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा