1. वाजवीता मुरली !
कान्हा तो मुरारी !
गोकुळीचा गिरीधारी
राधिका होई बावरी!
2. कान्हा च्या बासरीत
लागताच ध्यान
राधिकचे सदासाठी
हरपते भान !
3. राधिका कान्ह्याची
करिते मंथन !
कृष्ण !कृष्णची
बोलती कंकण !
4. राधेचा कान्हा तो
वाजवीता पावा !
गोकुळीच्या मोहनचा
करी जन धावा !
5. सोडिता गोकुळ !
विनवी राधिका!
सोड अक्रुरा कान्हा
कोसती गोपिका !
6. असा गोड पावा !
वाजविता कान्हा !
बासरीने गोकुळात
फुटे गाईंना पान्हा !
7. पहा गोकुळात कान्हा
खेळ खेळे राधे संग
आनंदात रंगलेला
रंग खेळण्यात दंग
8. विसरूनी मी तू पण
कान्हा राधा झाले दंग
देहभान विसरुनी
रंगी रंगला श्रीरंग
9. मुरलीचा येता सूर
होई राधिका बावरी
रंगी रंगे कान्हाच्या
वेड लावे तो श्रीहरी
10. दावी धरा रंगोत्सव
येता पहा हा वसंत
सृष्टी पहा बहुरंगी
रंगी राधा कान्हा हसत
11. भेदभाव सारु दूर.
जैसा खेळे तो श्रीरंग
राधेच्या कान्हा सम
आनंदात होऊ दंग
12. पहा मूर्तीमंत प्रेम
असे भक्तीचे प्रतिक
रंगी रंगता प्रेम ते
राधा कान्ह्याचे सात्विक
13. राधिकेच कान्हा
वसे तो अंतरी
तया वीण तिचा
दुजा नसे हरी
14. वेड लागले राधेला
. पाही जळी स्थळी हरी
कान्हा विण नको तिज
कान्हा कान्हा नावच अधरी
15. जळी स्थळी पाही राधा
कान्हा हाची एकमात्र
दुजा कोणी न तिजला
दिसे श्यामच सर्वत्र
16. ध्यानी मनी तो कान्हा
मनी देवकी नंदन
हरी नाम सदा मुखी
जरी करिता मंथन
17. अविरत करी राधा
सदा मनीचे चिंतन
कृष्ण कृष्णची शब्द ते
सदा बोलती कंकण
18. सावळ बाधा राधेला
होई राधिका बावरी
कान्हावरी तो भाळिली
मुरलीचा तो मुरारी
19. नाद मुरलीचा ऐकता
राधा हरपते भान
गोप गोपिका सवे
कान्हा कडे तिचे ध्यान
20. गोकुळाची तहान भुक
हरपते कान्हाची बासरी
मोहनची छबी पाहण्यासाठी
होई राधा गौळण बावरी
21 भुल पडे या राधेला
कान्हा संगे येता क्षणभरी
. कशी आवरु मनाला
मन गुंतते तुझ्याच अंतरी
22. जाता आम्ही मथुरेच्या वाटेवरी
दही दुध लोणी घेउनी बाजारी
वाट अडवितो खट्याळ कान्हा
गोपिकांना राधेला. छळतो भारी
23. दही दुधाची कान्हा करि चोरी
सवंगडी संगे मटकी फोडी
संभाळ ग यशोदे कान्हाला
राधा सांगे तयाची खोडी
24. जळी स्थळी
राधा पाही
दिसे कान्हा
दुजा नाही
25. राधे लागे
कान्हा छंद
तिला मिळे
स्वर्गानंद
26. कान्हा सवे
येता क्षणी
सुखावते
राधामनी
27. त्या राधेच्या
चिंतनात
कान्हा नाद
कंकणात
28, नको नेऊ
मथुरेस
तू आक्रुरा
श्रीकृष्णास.
29. कान्हासाठी
ती राधिका
कोसताती
त्या गोपिका
30. कैसे कंठु
एक दिन
कान्हाविण
राधा क्षीण
31 वेड लावे
कान्हा भारी
राधा भोळी
ती बावरी
32. प्रेमभक्ती
चे प्रतिक
कान्हा राधा
ते सात्त्विक
33 वृंदावनी ती खेळे
हरीचा संग
राधा मुरारी
खेळण्यात ची दंग
34. भाळली कान्हावरी
कुजबुजती गोपिका
हरीचा संगती सदा
रममाण राधिका
36. आज गोकुळात
रंग खेळे गोपिका
कान्हाने रंगविता
बावरली राधिका
37. अडविते राधा
नको टाकू रंग
कान्हा तर झाला
आनंदात दंग
38. अडविता कान्हाला
खेळताना राधा
पण नुउमजे तिला
झालीय कृष्ण बाधा
39. जन हसताती सारे
वाट सोड क्षणभर
किती छळतो राधेला
थट्टा कान्हा पुरे कर
40. चित्त चोर कान्हा
वाट सदा रोकतो
विनवणी न ऐकता
सवंगडी सह छळतो
41. गोपिका सांगती राधेला
नको जाऊ गोकुळाला
कृष्ण बाधा झालेली
कशी ऐकणार ती ग्वाला
42. कान्हा संगती येता राधा
मन होई पुलकित
विसरते काम मनीचे
असेच होई सदोदित
43. उगा मुकुंदा छळु नकोस
राधेला छळण्यात कसली गोडी
मटकी फोडता भिजते साडी
असली कसली कान्हा खोडी
43 सोड वाट.राधेच्या कान्हा
उशीर होतो बाजाराला
पुरे कर तुझ्या खोड्या
जाऊ दे रे नंदलाला
44 नको ना पाडू भुरळ
संगती येता क्षणभर
ओढ लागे राधेच्या मना
विनविते कान्ह्याला खरोखर
45. कृष्ण वाजवी पावा
बावरी होई राधा
पाहता वळूनी कळे
प्रीतीची तीज झाली बाधा
46. रंग खेळतोय
कान्हा गोकुळात
गोपीका सांगती
राधा ,बस तू घरात
47. आज चाले रंगोत्सव
रंगी रंगला श्रीरंग
राधिकेचा कान्हा पहा
रंग खेळण्यात दंग
48. चटोर चित्त चोर कान्हा
रंग टाकतो हात पकडूनी
रंगवेल तुलाही राधिका
गोपिका सांगती समजावूनी
49. किती समजावू तूज
विनविती तिज गोपिका
कान्हाचे वेड लागता
कशी ऐकल राधिका
50. कोणी न राहिले रंगा विण
रंग खेळले गोकुळी आज
राधेचा कान्हा दोघेही तयात
प्रत्येकाला रंगाची साज
51. रंग खेळता खेळता
जमला गरबा रासचा खेळ
रात्र भर राधेचा कान्हाचा
गेला खेळण्यात वेळ
52. ढोल ताश्याचा आवाजात
वाजली कान्हाची बासरी
नाद येता कानी राधिका
शोधे ,कुठे आहे श्रीहरी?
53 राधेच्या कान्ह्याची
मधूर बासरी
वेड लावी जिवा
असा तो श्रीहरी
54. होती मंत्र मुग्ध स्वरे
पक्षी प्राणी जन सारे
राधेच्या कान्हाचा पावा
वाजवी मधूर न्यारे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा