गुरुवार, १७ जून, २०२१

चित्र काव्य....कल्पना पूर्ती

शब्दरजनी साहित्य  समूह 
चित्र  काव्य

*कल्पना पूर्ती*

आला आला पाऊस आला
निळे अथांग चोहीकडे पाणी 
वर्षा धारेची वरून बरसात
चल सखे गाऊया प्रीत गाणी

झेलू थेंब पावसाचे मिळूनी
करुया नौका विहार मजेत
लुटूया आनंद पहिल्या पावसाचा
किती मजेचे क्षण आलेत

 लाल नौका  लाल छत्री 
फुल नावेत फुललेले सुंदर 
दोघे आपण उभे नावेत
जन बघतात दृश्य  मनोहर

आला बघ तो  दिसे पैलतीर
थांबेल आता तो पाऊस
कागदाचीच ती होती नौका
कल्पनेतील पूर्ण  झाली हौस

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...