अ भा म सा प स्वप्नगंध समूह
विषय -चला जाऊ या रानात
अष्टाक्षरी
चला जाऊ भटकण्या
मजा वाटे रानी वनी
फोफावल्या तरुवेली
मोद मिळे मनोमनी
शुध्द निर्मळ निसर्ग
हिंडू फिरु रानातूनी
वारा गाई गोड गाणी
पक्षी गाती वृक्षातूनी
रान मेवा चाखण्याची
लूटु मजा आनंदाने
चिंच करवंदे खात
मस्त रमूया मोदाने
झेलू थेंब पावसाचे
निसर्गाच्या सानिध्यात
रमणीय निसर्ग हा
वेळ घालवू रानात
वर्षा धारा बरसता
धरा होईल हरित
पहा नेसली लाजत
दिसे सुंदर खचित
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा