नक्षत्र वेल साहित्य समूह
काव्य -- उधळला रंग प्रीतीचा
वर्षभरात ऋतु सहा धरेचे
प्रत्येक ऋतूत रुप वेगळे
एकाहून एक दिसे तयाते
सहा ऋतू चे सहा सोहळे
येता ऋतू तो वसंत
वदती ऋतूंचा राजा
आनंदे बहरे अवनी
उगा का त्याचा गाजावाजा
नानाविध रंगी फुले फुलली
कुणी काढली रांगोळी धरेवर
लाल केशरी पीत वर्णी रंगात
पहाण्या मोह न आवरे क्षणभर
पळस बहवा फूलोनी
करी हळद कुंकूची उधळण
उधळला सर्वत्र रंग प्रीती चा
किती करावी रंगाची साठवण
वसंत ऋतुची ही किमया
धरेने उधळले रंग प्रीतीचे
पहा कशी लाजून बहरली
स्वागत होई ऋतुराजाचे.
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा