काव्यस्पंदन राज्य स्तरीय 02
आष्टाक्षरी रचना
विषय - दागिना
हिरे मोती सोनियाचे
आभुषणे आहे बरी
बाह्य रुप शोभविण्या
येती मदतीस खरी 1
हाती सुवर्ण कंकण
शोभा देतसे हातास
पण खरी शोभा दिसे
जेव्हा पुढे तो दानास 2
विद्या असे जो दागिना
दडलेला हृदयात
नसे भय होण्या चोरी
भुषवितो जगतात 3
विनयता आभूषण
सर्व जगात महान
मोल तयाचे सदैव
दागिन्यात मौल्यवान 4
नाव कुळाचे राखिती
तेची दागिने महान
अशी बालके भुषणे
तोच खरा बहुमान 5
...........................वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा