चित्र
हाती आले चित्र जुने ,
मन गेले मागे- मागे,
काहूर दाटले, मनीं आठवांचे
मन रमले भूतकाळाते .
सहज आला विचार मनी ,
चित्राची किती कृपा जगावरी ?
नव्हते शब्द वा भाषा अधरी ,
चित्रच वाच्यता करि संभाषणी.
दिसते नयनांना, ते दृष्य असे,
छायेने रेखियता, चित्र होतसे ,
चित्र रंगविते, भाव दृष्याचे
चित्र सांगते, भाव मनाचे .
चित्र दावि, नवरस भाव
असीम भाव उमटतात तयात.
चित्र करिते, सजाण बालकास ,
अन देते रंजन मनास .
चित्रानेच जतले भूतकाळाला,
इतिहासाला अन संस्कृतिला.
नसते छायाचित्र वा चित्र जगती,
कशी प्रगत झाली असती सिने सृष्टी .
हाती आले चित्र जुने ,
मन गेले मागे- मागे,
काहूर दाटले, मनीं आठवांचे
मन रमले भूतकाळाते .
सहज आला विचार मनी ,
चित्राची किती कृपा जगावरी ?
नव्हते शब्द वा भाषा अधरी ,
चित्रच वाच्यता करि संभाषणी.
दिसते नयनांना, ते दृष्य असे,
छायेने रेखियता, चित्र होतसे ,
चित्र रंगविते, भाव दृष्याचे
चित्र सांगते, भाव मनाचे .
चित्र दावि, नवरस भाव
असीम भाव उमटतात तयात.
चित्र करिते, सजाण बालकास ,
अन देते रंजन मनास .
चित्रानेच जतले भूतकाळाला,
इतिहासाला अन संस्कृतिला.
नसते छायाचित्र वा चित्र जगती,
कशी प्रगत झाली असती सिने सृष्टी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा