जादू
दुनिया ही जादूची नगरी
पाहिले तर,
सर्वत्र जादूने भरलेली
कुणा जादू करि,
तिचे मानेचे वेळावणे,
तर कुणा करी
भाळा वरील बटांचे रुळणे ,
निरागस हास्य बाळाचे ,
जादुई सम भासे
अन मन सदैव हरपते पाहूनी मातेचे.
निसर्ग काय कमी जादुगार ?
क्षणात ऊन तर, क्षणात पाऊस .
काळे मेघ दावि जादू नभातूनी,
लखकन बिजलीतून चमकुनी.
थेंब मृगाचे पडता धरणी,
जादुपरि गंधित होई, तप्त अवनी.
निसर्ग किमयेने सृष्टी नटली,
चंद्र कलेने सागरास भरती-ओहोटी
संगीत सुरात जादू भरलेली,
कष्टी मन जाई आनंदुनी
खरी जादू तर या विधात्याची
बनविली धरा, नभ ता-यांची
दुनिया ही जादूची नगरी
पाहिले तर सर्वत्र जादूने बहरलेली
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा