गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

किंमत. ( कशा कशाची)


मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 

विषय

किंमत.  (  कशा कशाची)


वेळ ,व्यक्ती ,वस्तू ,पैसा ,श्रम

सर्व सर्वची असे बहु मोल

कशा कशाची  किंमत मोजणार

जगी काही नाही अनमोल 


होता सकाळ घाई कामाची

नास्ते ,डबे , स्वयंपाक कामाची

जाणावी   किंमत वेळेची

शाळा ,कचेरी ,उद्योगास जाण्याची 


महिना संपताच घराचे रेशन,

घरभाडे घरखर्च दावे किंमत पैशाची 

स्वतः साठी कुटुंबासाठी वेळ देता

धावपळीत समजेल किंमत वेळेची



देवे दिधला जन्म मानव

जाणा किंमत जीवनाची

सत्कर्म करून आनंदे राहू

ठेव जपू संचित कर्माची


पाणी हे निसर्ग दत्त

तरी जाणा त्याचे मोल

जल   जिरवा  मातीत

राखू     निसर्गाचा   तोल



 माय बाप गुरू यांची

सदैव हवी जाण जीवनी

 ठेवून किंमत त्यांच्या कष्टाची 

ऋण मानावे मनोमनी


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

पंचाक्षरी...तलाव

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित उपक्रम 
पंचाक्षरी लेखन 
विषय. तलाव

गावाच्या वेशी 
आहे तलाव. 
नाही तयाचे 
ठाऊक नाव


नित्य येतात
फिरण्या जन . 
होते सा-यांचे
आनंदी मन.

उठे तरंग 
 मना आनंद 
पाहता लागे 
जीवाला छंद .

हंसाची जोडी 
तरंगे छान. 
 कमळ फूले
 वाढवी शान.

वाहता वारा 
झाडे डुलती 
 सावल्या त्यांच्या
जळी हासती.

तळ्याच्या काठी. 
वड तो उभा. 
भासे जणु की 
घेतोय  सभा. 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

मोहपाश


लालित्य नक्षत्रवेल
आयोजित 
उपक्रम अष्टाक्षरी

विषय -  पाप मोहाचे सुटेना


मन असते चंचल
काम आहेची कठीण
क्षणा क्षणाला धावते
मनी विचार  नवीन

सहा पहा षडरिपू
 संस्काराची मनी  ठेव. 
 तरी  ग्रासताती मना
  भूल पाडी एकमेव

मन कसे आवरावे
मना कधी उमजेना
मन चंचल पाखरु
  मोह पाशाचे सुटेना

माझे माझे सुटेचना  
भव ताप होतो फार  
जीव अडके मोहात
होती  यातना अपार  

पाश मोहाचे सोडण्या
हवी अध्यात्माची जोड
संत वाणी ऐकू  सदा
जीवनाचा अंत गोड

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

काव्य बत्तीशी ..सरत्या वर्षात शिकलेल्या गोष्टी

मोहरली लेखणी साहित्य समूह 
उपक्रम क्रमांक 1359
सरत्या वर्षात शिकलेल्या काही गोष्टी 
काव्य बत्तीशी 
7/9/7/9

 वर्ष सरत आले
सुरु झाला आखरी मास 
या वर्षी शिकले मी
नव्या गोष्टी ही हमखास 

जाणत नव्हते मी
वृत्त बध्द काव्य लेखन 
जाण झाली  समूही
मिळाले विचारांचे धन.

देऊन शब्द रोज
करविला आम्हा सराव
दावूनी चुका नित्य
घेतला लेखनाचा ठाव.

कार्यशाळेत पहा
देताची  नवीन विषय 
सरसाविती सारस्वत
ध्यानी घेता आशय

घेतले संभाळूनी
अनंत  आहे उपकार 
 न दाखविता   राग 
नाही आम्ही विसरणार .

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

माझा आधार कुटुंब. कुटुंब वृत्त बध्द पण आहे

वल्ड व्हिजन टाईम्स ऑफ इंडिया     मधे
काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक 734

13/12 /25
विषय .. कुटुंब 
शीर्षक - माझा आधार कुटुंब


कुटुंब नसे चार व्यक्तींचा
सहज एकत्र रहाता मेळावा
तर असे प्रेमाचा, जिव्हाळ्याचा
एकमेका जीव देणारा गोतावळा.

आई करीतसे  संस्कार सिंचन
बाबा असती  कुटुंंब आधार   
प्रेमळ नाते भाऊ बहीणीचे
ताई उचले आईसंगे घराचा भार.

भिंती  घराच्या असती खंबीर
 जिव्हाळ्याचा घेती ठाव
 सदा एकमेकांना  देती साथ
 नित्य  एकमेकांशी  प्रेम भाव

नाती गोती जपत कुटुंब
सदा मनी कुटुंबा अभिमान 
सुख आनंद मिळवे जीवनात
 कुटुंब जनांचा वाढे जगी  मान.

रहातो सदा गुण्या गोविंदाने
नसतो विचार स्वार्थाचा
देणे आनंद, सुख, कुटुंबजनांना
हाच विचार असे  सदा मनाचा

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

घर ... कविता/कथा / पत्र ल ेखन / लेख / ..अभंग बाल कविता

लोक मान्य. लोकनेता टिळक

विषय *लोकमान्य*

 भारतीय  पेहराव 
 लोक मान्य टिळकांचा
 विडा स्वातंत्र्य प्राप्तीचा 
उचलला नेतृत्वाचा.

*लोक* हीच शक्ती आहे
मिळविण्या स्वातंत्र्य.  
प्रबोधन दिले  जना
 घालविण्या पारतंत्र्य 

हक्क मागण्या स्वातंत्र्याचा
 सिंह गर्जना केली  बेधडक
स्वातंत्र्याचा लढ्यासाठी
 प्रेरणा  व धैर्य दिले बेशक

जन जागृती करण्या
गणेश उत्सव केला सुरू
 एकतेचे बळ आणण्या
झाले ते, स्वातंत्र वीरांचे गुरू

तरुण भारत,केसरी 'तून
केली  जागृती जनात
केल्या शिक्षण संस्था स्थापन
गीतारहस्य रचिला कारावासात.

निर्भयतेने मांडित मते
स्वातंत्र्याचा  होता ध्यास 
कधी न झुकले कोणा पुढे
लोकमान्य लोक नेता खास



वैशाली वर्तक 

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...