शनिवार, १३ डिसेंबर, २०२५
लोक मान्य. लोकनेता टिळक
विषय *लोकमान्य*
भारतीय पेहराव
लोक मान्य टिळकांचा
विडा स्वातंत्र्य प्राप्तीचा
उचलला नेतृत्वाचा.
*लोक* हीच शक्ती आहे
मिळविण्या स्वातंत्र्य.
प्रबोधन दिले जना
घालविण्या पारतंत्र्य
हक्क मागण्या स्वातंत्र्याचा
सिंह गर्जना केली बेधडक
स्वातंत्र्याचा लढ्यासाठी
प्रेरणा व धैर्य दिले बेशक
जन जागृती करण्या
गणेश उत्सव केला सुरू
एकतेचे बळ आणण्या
झाले ते, स्वातंत्र वीरांचे गुरू
तरुण भारत,केसरी 'तून
केली जागृती जनात
केल्या शिक्षण संस्था स्थापन
गीतारहस्य रचिला कारावासात.
निर्भयतेने मांडित मते
स्वातंत्र्याचा होता ध्यास
कधी न झुकले कोणा पुढे
लोकमान्य लोक नेता खास
वैशाली वर्तक
सोमवार, ८ डिसेंबर, २०२५
वृत्तबध्द... वृत्त आनंदकंद. विषय कविता ,२)दुनिया३) दु:ख
वृत्त आनंद कंद
लगावली गागाल गालगागा गागाल गालगागा
विषय ...कविता
शीर्षक. प्रेम कवितेशी
दैनंदिनी पहाता,आले विचार ओठी.
ओवीत शब्द माळा, कविता तयार मोठी.
झरतात शब्द जेव्हा,वाहे अखंड सरिता.
माझ्या कवी मनाची, भावे जनास कविता.
बेधुंद होत मन हे, येताच शब्द हाती
सुचता विचार धारा, ओंजळ भरुन जाती.
पाहून डोलणारी ,वा-या सवे फुले ती,
रेखाटता सहजची , आनंदली मुले ती.
देते कधी सुवचने, सारून ती निराशा.
संबोधते./ जनांना , उजळेल आज आशा
दावीतसे अबोला ,का तू कधी रुसूनी
यमके न साथ देती ,बसतेस तू फुगूनी,
माझे मला कळाले, करिताच नित्य वाचन
स्फूरेल काव्य मजला, नियमित करीन लेखन
वैशाली वर्तक
अहमदाबाद
बुधवार, ३ डिसेंबर, २०२५
चित्र काव्य
सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम 673
दि 3/12 ते 4/12
चित्र काव्य
आईची माया
संपताच पानगळ सुरू
ग्रीष्म ऋतूची दाहकता
लाही लाही होते अंगाची
नको वाटे, ती रवीची प्रखरता
माता पदर, तिच्या साडीचा
धरी लेकरांच्या शिरी
वात्सल्याची देतसे छाया
आईचे प्रेम दिसे ऊरी
केविलवाणा चेहरा उन्हाने
आई हृदया पाहवेना
सहजतेने उमजले तिजला
अशी सावली देऊ लेकींना
आईच्या प्रेमळ हिरव्या पदरी
लेकी चालती छायेत
उगाच का म्हणती जगी या
उणीव न भासे आईच्या मायेत
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भावना
मन असते चंचल
करी क्षणोक्षणी विचार
कल्पनेत होता रममाण
भावनांचे दर्शन अपार
मनातील भाव दाखवी
भावना मुखावर क्षणात
विरहाचे भाव दिसती
सहजची वागण्यात
भावना असे संवेदना
प्रसंग येतो जसा
अंतर्मनीच्या भावना
भावदर्शन घडे तसा
घडता भिषण प्रसंग
विमान अपघाताचा
दु:खी भावना मनाने
धावा सुरु मनी देवाचा
सुरू करी धावा मनी देवाचा
वैशाली वर्तक
सोमवार, १७ नोव्हेंबर, २०२५
वृत्तबध्द.... वृत्त आनंद कविता (2). विषय ... 1गुरू दक्षिणा . 2. पाऊस
वृत्त बध्द कविता
वृत्त आनंद
लगावली ... गागाल गालगागा
गुरू दक्षिणा काव्य
आभार मानण्याते
काहीच आकळेना
शब्दात मांडु कैसे
माझे मला कळेना.
वृत्तात जाण आली
ज्ञानात वाढ झाली
साहित्य लेखनाची
आवड मना मिळाली.
होती मनी अपेक्षा
वृत्तात पद्य यावे
देवून ज्ञान तुम्ही.
सारे तयार व्हावे
आहोत आपणाचे
सारे सदैव ऋणी
कविताच पाठवूनी
आनंदले मनानी
वाचून हर्ष व्हावा
आहे मनी शुभेच्छा
देते गुरू दक्षिणा
आहेच ही मनीच्छा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गागालगा लगागा
आनंद वृत्त
विषय ...पाऊस
केला सहन उन्हाळा
कोमेजली शिवारे
केव्हा पडेल पाणी
वाहील थंड वारे
आले भरून अंबर
आनंदले मनाने
येतील थेंब आता
पाऊस तो क्षणाने
आलाच तो पहाना
आतुर मना जरासा
पाहून मेघ गगनी
जीवास तो दिलासा
वसुधा पहा बहरली
काळी मृदा खिदळली
पुष्पे हसून फुलली
तृणांकुरे पसरली
का रे अतीच येतो
तू थांब ना जरासा
काहीच का कळेना
झालाय तू नकोसा
राजा बळी जगाचा
लावून आस राही
कैसा लबाड तू रे
वेळेत येत नाही
वैशाली वर्तक
अहमदाबाद
रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५
वृत्तबद्ध .....भुजंग प्रयात. सख्या रे. कविता
वृत भुजंगप्रयात
लगावली. लगागा लगागा लगागा लागा
सख्या रे
कितीदा तुला सांगते मी फिरुनी
सख्या ये तरी तू नदीच्या किनारी
नको ते फुकाचे बहाणे सदाची.
मनी खेद दाटे उरी तो फिरूनी
मनीची गुपीते कथाया तुला मी
कधी सांग येऊ नदीच्या किनारी
कितीदा विनंती करावी तुला रे
तुलाही कळावी मनाची व्यथा रे
नको ते, तुझे रे , कधी चांदणे ही,
तुझी साथ राहो नशीबी सदाही.
वैशाली वर्तक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
अलिप्तता व दुर्लक्षता
अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत. .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही तो लहानाचा मोठा होतो. ...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...

